आरोग्य व पाणी पुरवठ्याचा विषय गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:57 PM2017-12-22T21:57:45+5:302017-12-22T21:58:25+5:30

जिल्हा परिषदेशी संबंधीत असलेल्या प्रलंबित विषयांना घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील अनियमित व प्रलंबित कामांचा विषय चांगलाच गाजवून सोडला.

The topic of health and water supply is gone | आरोग्य व पाणी पुरवठ्याचा विषय गाजला

आरोग्य व पाणी पुरवठ्याचा विषय गाजला

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेशी संबंधीत असलेल्या प्रलंबित विषयांना घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आढावा बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेशी संबंधीत असलेल्या प्रलंबित विषयांना घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील अनियमित व प्रलंबित कामांचा विषय चांगलाच गाजवून सोडला. शिवाय पशु संवर्धन व तीर्थक्षेत्र विकासाचा मुद्दाही उचलून धरला. यावर आमदार अग्रवाल यांनी सर्व समस्या सोडविण्याचे निर्देश संबंधीत अधिकाºयांना दिले.
जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेत तसेच आमदार गोपालदास अग्रवाल व मुख्य कार्यपालन अधिकारी (सीईओ) रवींद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी आरोग्य विभागाकडून ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र कागदावर चालत आहे. मात्र या केंद्रांत वैद्यकीय अधिकाºयांचे पद रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी रिक्त पदांच्या भरतीचे अधिकार मंत्रालयात असल्याचे कारण पुढे करून आपल्या जबाबदारीपासून पळत असल्याचे सांगीतले. तसेच पाणी पुरवठा विभागाबाबत सांगताना, कोट्यवधींच्या पाणी पुरवठा योजनांच्या बांधकामात अधिकाºयांना रूची असते. मात्र त्यानंतर योजनांच्या माध्यमातून लोकांना पाणी मिळत आहे की नाही, जलस्त्रोतांपासून योजनेला पर्याप्त पाणी मिळत आहे की नाही, याकडे कुणा अधिकाºयाचे लक्ष नाही. कोट्यवधी रूपये खर्चूनही कित्येक योजना अनुपयोगी पडून असल्याचेही सदस्यांनी सांगीतले.
पशु संवर्धन विभागाबाबत विभागाकडून वैशिष्टपूर्ण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पशुधन व गोठे वितरणात अनियमीतता तसेच तिर्थक्षेत्र विकासाकरिता जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधी वाटपात अनियमिततेचा मुद्दाही सदस्यांनी बैठकीत उचलून धरला. यावर आमदार अग्रवाल यांनी, शासनाच्या विकास निधीतून समाजातील अंतिम व्यक्ती पर्यंत लाभ पोहचविणे हे जिल्हा परिषदेचे उद्देश असल्याचे सांगत, जिल्ह्याचा विकास निधीतून निश्चीतच विकास कामे व्हावी व ती दिसावी असे सांगीतले. यासाठी संबंधीत अधिकाºयांनी समस्यांचे निराकरण करावे असे निर्देश संबंधीत अधिकाºयांना दिले.
बैठकीला सभापती विमल नागपुरे, पी.जी.कटरे, सदस्य विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सिमा मडावी, शेखर पटेल, उषा शहारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दीपक पवार, लता दोनोडे, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, अर्जुन नागपुरे उपस्थित होते.
रस्ते खड्डे मुक्त करा, अन्यथा कारवाई
बैठकीत आमदार अग्रवाल यांनी, रस्त्यांवरील खड्डे दुरूस्तीचा विषय मांडला. त्यांनी राज्य सरकारने रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी घेतलेला संकल्प प्रशंसनीय आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने ग्रामीण रस्त्यांना प्राधान्याने दुरूस्त क रावे, या कामात कसलीही अनियमीतता आढळल्यास कठोर कारवाईसाठी तयार राहा असा इशारा दिला. शिवाय दलित वस्ती विकास योजना व जिल्ह्यातील ग्रामीण शाळांतील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावरही बैठकीत चर्चा केली.

Web Title: The topic of health and water supply is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.