आजची पिढी उद्याचे सुदृढ नागरिक
By Admin | Updated: March 24, 2017 01:37 IST2017-03-24T01:37:55+5:302017-03-24T01:37:55+5:30
शालेय मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मुलांना आनंददायी शिक्षण दिले पाहिजे. मुलांचे आयुष्य घडविण्याचे काम शिक्षक करतात.

आजची पिढी उद्याचे सुदृढ नागरिक
चंद्रकांत पुलकुंडवार : चाचा नेहरु बालमहोत्सव कार्यक्र म
गोंदिया : शालेय मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मुलांना आनंददायी शिक्षण दिले पाहिजे. मुलांचे आयुष्य घडविण्याचे काम शिक्षक करतात. त्यासाठी आजची पिढी उद्याचे सुदृढ नागरिक निर्माण झाली पाहिजेत, असे प्रयत्न करुन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्तवतीने बुधवारी (दि.२२) भवभुती रंग मंदिर येथे आयोजित चाचा नेहरु बाल महोत्सव कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ.माधुरी नासरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नम्रता चौधरी, बाल न्याय मंडळाच्या सदस्य आशा ठाकुर व बाल कल्याण समितीच्या सदस्य निता खांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.पुलकुंडवार यांनी, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नि:स्वार्थ भावनेने अविरत काम केले पाहिजे. मुलांमध्ये चांगले संस्कार बिंबविण्याचे प्रयत्न करावे. आपणही या समाजाचे एक घटक आहोत अशी आपली वागणूक असायला पाहिजे. समाजामध्ये जे घडते त्याचे अनुकरण लहान मुले करतात, कारण लहान मुले हे अनुकरणप्रिय असतात. सर्वांना सुरक्षीत जगता येईल अशी आपल्या समाजाची भावना असायला पाहिजे. आपल्यामध्ये वंचितांचे भले करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे.
मुलांवर जास्तीत जास्त प्रेम करावे. अनाथालयांमध्ये जी मुले आहेत त्या मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी आपल्या अपत्यासारखे अनाथ मुलांची काळजी घेतली तरच त्या मुलांचा निश्चित विकास होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोहिते यांनी, बालकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे हा बाल महोत्सवाचा उद्देश असून मुले ही सुदृढ व निरोगी राहण्यासाठी मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. लोया यांनी, बाल महोत्सव कार्यक्र माच्या आयोजनातून बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो. खेळाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो असे सांगितले.
डॉ.नासरे यांनी, बाल महोत्सव हा कार्यक्र म दरवर्षी झाला पाहिजे, जेणेकरु न मुलांमध्ये जे सुप्त गुण लपलेले आहेत ते बाहेर आले पाहिजेत. यामुळे मुलांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण होते. आज बालकांची काळजी व संरक्षणाची गरज असल्यामुळे येथे बालकांचे निरिक्षणगृह असणे गरजेचे आहे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी बाल न्याय मंडळाच्या सदस्य श्रीमती आशा ठाकुर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकातून चौधरी यांनी, शासकीय व स्वयंसेवी संस्थामधील अनाथ, निराधार, उन्मार्गी तसेच संस्था बाहेरील मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणे हा बाल महोत्सवाचा उद्देश आहे. देशाचे भावी आधारस्तंभ ही बालके आहेत, त्यासाठी बालकांना कायदे व संरक्षणाची आज गरज आहे असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्र मास बाल कल्याण समितीच्या सदस्य निता खांडेकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बोंद्रे, बाल कल्याण संरक्षण अधिकारी बैस, संरक्षण अधिकारी रु पाली सोयाम, माहिला व बालकल्याण विभागाचे परिविक्षा अधिकारी रामटेके, सरस्वती महिला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वाघ, शाळेचे संचालक रोकडे, शिक्षक व विविध शाळेतील विद्याथी-विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या विविध
क्रीडा स्पर्धा
बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशातून चाचा नेहरू महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हेच निमित्त साधून या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन कार्यक्रमाला लाभलेल्या मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. पाहुण्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातूनही विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांना उजाळा द्यावा असे मत यावेळी व्यक्त केले.