इंदिरानगरात टिल्लू पंपांचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:26 IST2021-02-12T04:26:57+5:302021-02-12T04:26:57+5:30

बाराभाटी : ग्रामपंचायतच्या लघू नळ पाणी पुरवठा योजनेंतर्गत इंदिरानगर येथील काही धूर्त नळ ग्राहक टिल्लू पंप लावून पाणी चोरी ...

Tillu pumps explode in Indiranagar | इंदिरानगरात टिल्लू पंपांचा धडाका

इंदिरानगरात टिल्लू पंपांचा धडाका

बाराभाटी : ग्रामपंचायतच्या लघू नळ पाणी पुरवठा योजनेंतर्गत इंदिरानगर येथील काही धूर्त नळ ग्राहक टिल्लू पंप लावून पाणी चोरी करीत आहेत. हा प्रकार सर्रास सुरू असून इतर ग्राहकांना पाण्यापासून वंचित राहत आहेत. तर दुसरीकडे मात्र ग्रामपंचायतचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे.

नवेगावच्या ग्रामीण रुग्णालय समोरील भाग म्हणजे इंदिरानगर आहे. या भागात सर्वसामान्य नागरिकांना न जुमानता काही ग्राहक स्वत:च्या नळाला टिल्लू पंप लावून पाणी खेचत आहे. परिणामी ग्राहकांच्या घरी पाणी पोहोचत नसून त्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. हा सर्व प्रकार सर्रास सुरू असूनही ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहेत. हा प्रकार त्वरित बंद करण्यात यावा, नळ ग्राहकांची अडचण सोडवावी, अशी मागणी यशवंत साखरे, वनिता गायकवाड, विनोद नैताम, कौशल्या सोनवाने, माया सोनवाने, सिंधू पंधरे, मंगला येटरे, चुन्नीलाल कांबळे, घनश्याम कापगते, मंदा दहिवले यांनी केली आहे.

Web Title: Tillu pumps explode in Indiranagar