रबीसाठी देणार बाघ इटियाडोहचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:06+5:30
सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून हे पाणी रब्बी पिकांसाठी देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील कालीमाटी येथे आयोजित सभेत शेतकऱ्यांनी केली. यावर बाघ इटियाडोह सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सोनुले यांनी रब्बीसाठी पाणी देण्याची ग्वाही दिली.

रबीसाठी देणार बाघ इटियाडोहचे पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : यंदा जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. सध्या रब्बी धानाची रोवणी सुरू असून त्यासाठी पाण्याची गरज आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून हे पाणी रब्बी पिकांसाठी देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील कालीमाटी येथे आयोजित सभेत शेतकऱ्यांनी केली. यावर बाघ इटियाडोह सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सोनुले यांनी रब्बीसाठी पाणी देण्याची ग्वाही दिली.
बाघ इटियाडोह सिंचन प्रकल्पाचे पाणी आमगाव तालुक्यातील रब्बी पिकांसाठी देण्यात यावे. यासाठी कालीमाटी येथे रविवारी शेतकºयांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला आ. सहषराम कोरोटे, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जि.प.सदस्य सुरेश हर्षे,बाबुलाल दोनोडे, टिकाराम मेंढे, सेवकराम डोये, सुनील ब्राम्हणकर, हंसराज चुटे, संजू बहेकार,उल्हास बहेकार, यशवंत गौतम, सरपंच दोनोडे, रुपचंद गिºहेपुंजे, विजय भांडारकर, जयप्रकाश मेंढे, संतोष कापसे, भोजराज सोनवाने, गोपाल बाबा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पदाधिकारी व शेतकºयांनी बाघ इटियाडोहचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्याचा मुद्दा मांडला. यावर कार्यकारी अभियंत्यांनी रब्बीसाठी पाणी देण्यात येईल एकाही शेतकऱ्याचे पीक मरु देणार नाही. पाण्याचे नियोजन करुन सर्वच शेतकºयांना पाणी देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी शेतकºयांनी इतरही समस्या मांडल्या.