शुक्रवारी पहाटे गुरुपुष्यामृत योग
By Admin | Updated: September 17, 2014 23:54 IST2014-09-17T23:54:49+5:302014-09-17T23:54:49+5:30
सुवर्णखरेदी : सराफी पेढ्यांचा मात्र पुनर्वसूतच आग्रह

शुक्रवारी पहाटे गुरुपुष्यामृत योग
नाशिक : गुरुपुष्यामृतावर सुवर्णखरेदी हा एक पायंडाच गेल्या काही वर्षांपासून रुजला आहे आणि तो रुजविण्यात सराफी व्यावसायिकांचे मोठे योगदान राहिले आहे. आता पितृपक्षात सर्वत्र उलाढाल मंदावली असताना, गुरुवार, दि. १८ रोजी गुरुपुष्यामृत योग असल्याचे सांगत सराफी व्यावसायिकांकडून सुवर्णखरेदीचे मेसेज सोशल मीडियावरून फिरत आहेत. परंतु वास्तवात गुरुपुष्यामृतयोग शुक्रवारी पहाटे ३ वाजून २४ मिनिटांपासून ते सूर्योदयापर्यंत सकाळी ६ वाजून २९ मिनिटांपर्यंत असल्याने सराफी व्यावसायिक या कालावधीत आपल्या पेढ्या खुल्या ठेवणार आहेत काय, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. काही सराफी पेढ्या मात्र गुरुवारीसच गुरुपुष्यामृतयोग असल्याचे सांगत पुनर्वसू नक्षत्रातच सुवर्णखरेदीचा घाट घालताना दिसून येत आहेत.