छोटा गोंदियातील तीन तरुण निघाले बकरी चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:52+5:302021-02-05T07:47:52+5:30
गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बनाथर शेतशिवारातील मिलिंद भारत नागदेवे यांच्या मालकीच्या ३० नग बकऱ्या १४ सप्टेंबर रोजी ...

छोटा गोंदियातील तीन तरुण निघाले बकरी चोर
गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बनाथर शेतशिवारातील मिलिंद भारत नागदेवे यांच्या मालकीच्या ३० नग बकऱ्या १४ सप्टेंबर रोजी चोरी करण्यात आल्या. त्या बकऱ्या १ लाख २० हजार रूपये किमतीच्या होत्या. त्यांच्या शेतातील गोटफार्ममधून बकऱ्या चोरी करणाऱ्यांवर १५ सप्टेंबर २०२० रोजी रावणवाडी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात छोटा गोंदियातील अमोल उमराव कोल्हाटकर (२९), स्वामी लीलाधर बाहे (३२) व दुर्गेश ऊर्फ बालू लीलाधर दाते (३०) यांना अटक करण्यात आली. त्यांनी चोरलेल्या शेळ्या विक्री केल्या. त्यातून मिळालेल्या रकमेपैकी १० हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात वापरण्यात आलेले २ लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पो.उपनिरीक्षक महेश कोरे, पोलीस नायक चव्हाण, पोलीस शिपाई रुखमोडे, पोलीस शिपाई बिसेन यांनी केली आहे.