दरेकसा एरिया कमेटीच्या कमांडरसह तीन जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; २० लाखांचे होते बक्षीस

By अंकुश गुंडावार | Updated: December 13, 2025 19:53 IST2025-12-13T19:52:50+5:302025-12-13T19:53:36+5:30

Gondia : दरेकसा एरिया कमेटीचा कमांडर व दोन एरिया कमेटी मेंबर (एसीएम) अशा एकूण तीन जहाल माओवाद्यांनी शस्त्रांसह गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर शनिवारी (दि. १३) सायंकाळी आत्मसमर्पण केले.

Three Maoists, including the commander of Dareksa Area Committee, surrender; The reward was Rs 20 lakhs | दरेकसा एरिया कमेटीच्या कमांडरसह तीन जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; २० लाखांचे होते बक्षीस

Three Maoists, including the commander of Dareksa Area Committee, surrender; The reward was Rs 20 lakhs

गोंदिया : दरेकसा एरिया कमेटीचा कमांडर व दोन एरिया कमेटी मेंबर (एसीएम) अशा एकूण तीन जहाल माओवाद्यांनी शस्त्रांसह गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर शनिवारी (दि. १३) सायंकाळी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकत्रितपणे २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये रोशन ऊर्फ मारा इरिया वेडजा (कमांडर, दरेकसा एरिया कमेटी), सुभाष ऊर्फ पोज्जा बंडू रव्या (एसीएम) आणि रतन ऊर्फ मनकू ओमा पोयाम (एसीएम) यांचा समावेश आहे. त्यांनी माओवादी गणवेशात अग्निशस्त्रांसह गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. महाराष्ट्र शासनाने सन २००५ पासून राबविलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या मार्गाला कंटाळून आजवर अनेक वरिष्ठ व जहाल माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. याच पार्श्वभूमीवर २८ नोव्हेंबर २०२५ रोजी एमएमसी झोनमधील स्पेशल झोनल कमिटी मेंबर विकास ऊर्फ अनिल ऊर्फ नवज्योत नागपुरे याच्यासह एकूण ११ जहाल माओवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दरेकसा एरिया कमेटीतील काही माओवादी सदस्य अद्याप सक्रिय असल्याने गोंदिया पोलिस दलाने त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधून मुख्य प्रवाहात येण्यासाठी समुपदेशन व मनपरिवर्तनाचे प्रयत्न सुरू ठेवले होते. त्या प्रयत्नांना यश येत १३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित माओवाद्यांकडून ही शस्त्रे हस्तगत

रोशन ऊर्फ मारा इरिया वेडजा (वय ३५, रा. मेंढरी, ता.जि. बिजापूर, छत्तीसगड) हा दरेकसा एरिया कमिटीचा कमांडर असून, त्याच्या जवळून एसएलआर बंदूक, दोन मॅगझीन, २५ राऊंड हस्तगत केले. त्याच्यावर ८ लाखांचे बक्षीस होते. सुभाष ऊर्फ पोज्जा बंडू रव्या (२६, रा. येरापल्ली, पो. पामेड, ता. उसूर, जि. बिजापूर, छत्तीसगड) हा एरिया कमेटी मेंबर होता. त्याच्याजवळ एसएलआर, दोन मॅगझीन, २३ राऊंड होते. त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते. रतन ऊर्फ मनकू ओमा पोयम पोयाम (२५, रा. रेखापाल, पो. ओरचा, ता./जि. नारायणपूर, छत्तीसगड) हा एरिया कमेटी मेंबर होता. त्याच्याजवळून ८ एमएम शस्त्र, १ मॅगझीन, १५ राऊंड हस्तगत केले. त्याच्यावर सहा लाखांचे बक्षीस होते.

मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

"महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात आलेल्या सर्व नक्षलवाद्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येत आहे. नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात यावे."

- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक गोंदिया.

Web Title : गोंदिया में कमांडर सहित तीन माओवादियों का आत्मसमर्पण; 20 लाख का इनाम।

Web Summary : गोंदिया में कमांडर सहित तीन माओवादियों ने हथियारों के साथ पुलिस के सामने आत्मसमर्पण किया। इन पर कुल 20 लाख रुपये का इनाम था। हिंसा से मोहभंग और आत्मसमर्पण नीति से आकर्षित होकर, उन्होंने मुख्यधारा में लौटने का फैसला किया।

Web Title : Three Maoists, including commander, surrender in Gondia; 2 million rupee bounty.

Web Summary : Three Maoists, including a commander, surrendered to Gondia police with weapons. They carried a combined bounty of ₹20 lakh. Lured by the surrender policy and disillusioned with violence, they chose to return to the mainstream.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.