राहुलच्या तीन मारेकऱ्यांना अटक

By Admin | Updated: August 9, 2014 00:53 IST2014-08-09T00:53:58+5:302014-08-09T00:53:58+5:30

गोंदिया शहरात जमिनीची दलाली करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या मामा चौकातील राहूल धनराज खोब्रागडे (३३) याचा पैशाच्या वादातून तिघांनी खून केला.

Three of the assailants arrested by Rahul | राहुलच्या तीन मारेकऱ्यांना अटक

राहुलच्या तीन मारेकऱ्यांना अटक

गोंदिया : गोंदिया शहरात जमिनीची दलाली करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या मामा चौकातील राहूल धनराज खोब्रागडे (३३) याचा पैशाच्या वादातून तिघांनी खून केला. महिनाभरानंतर राहुल खोब्रागडे प्रकरणातील आरोपींना पकडण्यात गंगाझरी पोलिसांना यश आले.
६ जुलैच्या सायंकाळपासून तो बेपत्ता राहुल खोब्रागडे बेपत्ता झाला होता. होता. शहराच्या एनएमडी कॉलेजजवळील एका दुकानासमोर त्याचे वाहन आढळले. ८ जुलै रोजी गोंदिया शहर पोलिसात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.
राहूल धनराज खोब्रागडे रविवारच्या सायंकाळी ७.३० वाजता तो घराबाहेर पडला. त्याची मोटारसायकल एमएच ३५/ व्ही-८८१६ ही एनएमडी कॉलेजजवळील नर्सिग झेरॉक्स समोर पडलेल्या अवस्थेत आढळली. नातेवाईकांनी दोन दिवसापासून शोध घेतला. परंतु त्याचा पत्ता लागला नाही. रविवारच्या रात्री १०.३२ वाजता पर्यंत त्याच्या मोबाईलवर बेल जात होती. राहुल खोब्रागडेचे दोन लाख रुपये प्रमोद रामाजी कापगते (२४) रा. गांधी वॉर्ड गोंदिया याच्यावर होते. या पैशाच्या कारणावरून प्रमोद कापगते व राहुल खोब्रागडे यांच्यात बाचाबाची व्हायची. ४ जुलै रोजी प्रमोद व राहुल यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी राहुलने प्रमोद कापगतेला मारहाण केली होती. त्यानंतर ५ जुलै रोजी पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची होवून धक्काबुक्की झाली. यानंतर ५ जुलैच्या सायंकाळी प्रमोद कापगतेने मनोहर चौक गोंदिया येथील करण राधेश्याम अग्रवाल (२६) याच्या दुकानात बसून राहुल खोब्रागडेचा काटा कसा काढायचा याचा नियोजन केला. ६ जुलै रोजी दुपारी नमाद महाविद्यालयासमोर बोलावून पैसे सायंकाळी देतो असे सांगण्यात आले. सायंकाळी एमएच ३५/४०७१ मध्ये प्रमोद कापगते, श्रीनगराच्या चंद्रशेखर वॉर्डातील हरिश टिकाराम पराते (२४) व करण राधेश्याम अग्रवाल (२६) हे तिघेही एनएमडी कॉलेजसमोर आले. तेथे राहुलची त्यांच्यासोबत भेट झाली. त्याची दुचाकी तिथच ठेवून त्याला इंडिकात बसवले. गंगाझरी येथील एक इसम आपल्याला पैसे देणार आहे त्यासाठी तू पैसे घ्यायला चल असे म्हटल्यावर राहुल त्यांच्या गाडीत बसला. गाडी गंगाझरीच्या दिशेने निघाली. मुंडीपार एमआयडीची परिसर येताच त्या गाडीत बसलेल्या हरिष परातेने संडास लागल्याचे सांगून वाहन थांबविले. यावेळी सगळे गाडीबाहेर आले व चाकूने मारून राहुलचा खून केला. त्याच्या खूनाचे पुरावे नष्ट करण्याचा आरोपीने प्रयत्न केला.
या संदर्भात पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक नन्नावरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी माहिती काढून गंगाझरी पोलिसांच्या मदतीने या आरोपींना अटक केली. ठाणेदार सुरेश कदम व विशेष पथकाने केलेल्या कारवाईत या तिघांना अटक करण्यात आली. सदर आरोपींना न्यायालयाने १६ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Three of the assailants arrested by Rahul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.