‘त्या’ महिलांना तिसऱ्या गुन्ह्यात अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:41+5:302021-02-05T07:47:41+5:30
गोंदिया : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांच्या घरातून चार्जिंगला लावलेले मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन महिलांना गोंदिया शहर पोलिसांनी ...

‘त्या’ महिलांना तिसऱ्या गुन्ह्यात अटक ()
गोंदिया : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांच्या घरातून चार्जिंगला लावलेले मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन महिलांना गोंदिया शहर पोलिसांनी २९ जानेवारी रोजी अटक केली. त्या महिलांवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना आता तिसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. ते मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार गोंदिया शहर पोलिसांनी नोंदविली आहे. पळविण्यात आलेले हे सात मोबाइल १ लाख १४ हजार ९९० रुपये किमतीचे आहेत. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
गोंदिया शहरातून मोबाइल चोरी करणाऱ्या त्या महिला छत्तीसगडच्या डोंगरगड येथील आहेत. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या परिसरात विविध ठिकाणी खड्डे खोदून २५ मोबाइल गाडून ठेवले होते. ते २५ मोबाइल जप्त केल्यानंतर त्या महिलांची कसून चौकशी सुरू झाली. त्या तिन्ही महिलांना तिसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आणखी एक मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला आहे. शहराच्या मामा चौकातील मोसीम वल्द शफी शेख (३२) यांच्या घरातून २९ जानेवारीच्या सकाळी ८ वाजता दोन मोबाइल (किंमत सुमारे १७ हजार रुपये) पळविण्यात आले. विवेकानंद कॉलनी सिव्हिल लाइन गोंदिया येथील चैतन्य प्रकाश राहांगडाले (२९) यांच्या घरातील हॉलमध्ये टेबलवर ठेवलेले दोन मोबाइल (किंमत ५३ हजार) अज्ञात आरोपींनी २८ जानेवारीच्या सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान लांबवले. तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिसरी चोरीची घटना कुंभारेनगर, गोंदिया येथील आहे. कुंभारेनगरातील नितेश केशोराव डोंगरे (३९) यांच्या घरी हॉलमध्ये ठेवलेले दोन मोबाइल (किंमत २५ हजार रुपये) २९ जानेवारीच्या सकाळी ८ वाजता चोरी करण्यात आले. चवथी चोरी माताटोली शक्कर धर्मशाळा गोंदिया येथील गुलशन परमानंद नागदेव (३८) यांच्या घरी करण्यात आली. टेबलावर ठेवलेला १९ हजार ९९० रुपये किमतीचा मोबाइल या महिलांनी चोरी केल्यामुळे त्यांच्यावर गोंदिया शहर पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत.