‘त्या’ दोन चिमुकलींना हवे मातापित्याचे छत्र

By Admin | Updated: June 21, 2017 01:01 IST2017-06-21T01:01:13+5:302017-06-21T01:01:13+5:30

येथील रेल्वेस्थानक परिसरात ११ एप्रिल रोजी आढळलेल्या दोन मुलींना भीक मागताना पकडण्यात आले.

'Those' two sparrows have the umbrella of their parents | ‘त्या’ दोन चिमुकलींना हवे मातापित्याचे छत्र

‘त्या’ दोन चिमुकलींना हवे मातापित्याचे छत्र

गोंदिया : येथील रेल्वेस्थानक परिसरात ११ एप्रिल रोजी आढळलेल्या दोन मुलींना भीक मागताना पकडण्यात आले. ‘त्या’ दोन्ही मुलींना मात्यापित्याचा शोध आहे. त्या चिमुकल्यांच्या तोंडावर त्यांच्या आईवडिलांचे नाव येत नसल्याने त्यांची पर्यायी व्यवस्था म्हणून बाल कल्याण समिती, गोंदिया वरधान, शिशूगृह नागपूर येथे तात्पुरते दाखल केले आहे. पूजा (४) व शालू (२) अशी त्या दोन्ही मुलींची नावे आहेत. त्या भीक मागताना गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर पोलीस निरीक्षकांना आढळल्या. सदर बालिकांना बाल कल्याण समिती, गोंदिया यांच्या समोर सादर केले होते. त्या मुली आपल्या नावाव्यतिरिक्त दुसरे काहीही सांगत नाही. त्यांच्या जैविक माता-पिता नातेवाईकांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, कार्यालय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अंगूर बगीचा रोड, गजानन कॉलनी, गोंदिया येथे मो.७७०९६६१०४६, ९४०५९८५३४९ यावर संपर्क साधावे अथवा प्रत्यक्ष भेट घेण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुहान एस. बोंदरे यांनी केले आहे.

Web Title: 'Those' two sparrows have the umbrella of their parents