‘त्या’ भावडांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

By Admin | Updated: November 1, 2016 01:06 IST2016-11-01T01:06:08+5:302016-11-01T01:06:08+5:30

माणुस कोणत्याही आर्थिक लाभाच्या तसेच प्रतिष्ठेच्या मोठ्या पदावर विराजमान असला तरी

'Those' flutterous smile on the faces of the brothers | ‘त्या’ भावडांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

‘त्या’ भावडांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

कपडे व मिठाईचे वाटप : शिक्षणाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवतीने दिली अनाथांना ममता
बोंडगावदेवी : माणुस कोणत्याही आर्थिक लाभाच्या तसेच प्रतिष्ठेच्या मोठ्या पदावर विराजमान असला तरी त्यांच्यामध्ये सामाजिक बांधीलकीची भावना जागृत झाली तर ती व्यक्ती अंतर्मनातून त्या दु:खात सहभागी होऊन आपल्या परीने मदत केल्याशिवाय राहात नाही. याचाच प्रत्यय बाक्टी येथील आई-वडिलांचे छत्र हरविल्याने अनाथ झालेल्या भावंडांना आला.
बाक्टी येथील त्या दोन भावडांचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांनी कामाच्या व्यस्ततेमुळे आपल्या सौभाग्यवतींना प्रत्यक्षात बाक्टी येथे त्यांच्या राहत्या घरी पाठवून दिवाळीपूर्वी दोघा भावांना कपडे, मिठाई व रोख मदत करून त्या अनाथांना मायेची ऊब दिली.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथील स्नेहा दिनेश मेश्राम (१४), विराज (८) या बालवयातील दोघा भावंडाचे आई-वडील मरण पावले. एकाएकी जन्मदात्या मायबापाचे कृपाछत्र हरवल्याने ते दोघेही भाऊ अनाथ झाले. १४ वर्षाची असलेली स्नेहा हीच्यावव लहान भाऊ व ८० वर्षाची असलेली आजी याची जबाबदारी आली. हसण्या-बाळगण्याच्या दिवसामध्ये त्या भावडांवर अनाथ होण्याची पाळी आली. दोघा बहीण-भावडांना समाजातील सृजनशील सामाजिक कार्यकर्त्यांकडून काही आधार मिळावा म्हणून लोकमतच्या माध्यमातून त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीचे गांभीर्य प्रकाशीत करण्यात आले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन यापूर्वी गोंदियाच्या प्रा. सविता बेदरकर यांच्या सहकार्याने अन्नधान्य, कपडे व रोख १५ हजार रुपयाची मदत करण्यात आली होती. यादरम्यान शिक्षणाधिकारी उल्हास नरड याचेही मन हेलावून गेले. बाक्टी येथील जि.प.प्राथमिक शाळेतील शिक्षक कैलास हाडगे यांचेशी भ्रमणध्वनीवरून बोलून त्या अनाथांचे सांत्वन करण्याची तयारी दर्शविली.
दीपावलीच्या उत्साहात त्या अनाथ भावडांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून ममतेचा आभास व्हावा म्हणून त्यांनी पत्नी शुभांगी यांना बाक्टी-चान्ना येथे त्या अनाथ भावंडाकडे गुरूवारला (२७) पाठविले. त्या स्नेहा, विराज यांच्या घरापर्यंत आल्या. शुभांगीताईने मोठ्या आस्थेनी दोघाही भावडांची विचारपूस करून ममत्वाची ऊब त्यांना दिली. एक ध्येय समोर ठेवून दोघेही बहीण-भाऊ शिक्षण घ्या, अडचण आल्यास आधार देऊ असा दिलासा दिला.
शुभांगीताईनी त्यांना कपडे व गोड तोंड करून आर्थिक मदत केली. यावेळी प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका मिना लिचडे, छाया मदने, माजी सरपंच सुभाष मेश्राम, स.शि.कैलास हांडगे, मोटघरे प्रामुख्याने उपस्थित होते. त्या अनाथ भावंडाचे वास्तव चित्र दैनिक लोकमतने प्रकाशित केल्याने आर्थिक आधार मिळाल्याने प्रा. सविता बेदरकर यांनी लोकमतचे आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: 'Those' flutterous smile on the faces of the brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.