जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची एन्ट्री !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST2022-01-06T05:00:00+5:302022-01-06T05:00:02+5:30
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी एकूण ५०४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ४३२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर, ७२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १४ नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.७७ टक्के आहे. कोरोना बाधितांची संख्या गुणाकार पद्धतीने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक ३१ रुग्ण गोंदिया आणि आमगाव तालुक्यात १८ कोरोना बाधित आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हाटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची एन्ट्री !
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारनंतर बुधवारी (दि. ५) जिल्ह्यात पुन्हा १४ कोरोना बाधितांची नोंद झाली. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५ वर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची एन्ट्री झाल्याचे सूतोवाच दिले जात आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी एकूण ५०४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ४३२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर, ७२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १४ नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.७७ टक्के आहे.
कोरोना बाधितांची संख्या गुणाकार पद्धतीने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक ३१ रुग्ण गोंदिया आणि आमगाव तालुक्यात १८ कोरोना बाधित आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हाटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने ४७३०३९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २४८४१८ नमुन्यांची आरटीपीआर तर, २२४६२१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१२९६ नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०५३० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय
- जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट डिसेंबर महिन्यात ०.८२ टक्के होता. मात्र, यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाल्याने पॉझिटिव्हिटी ३.४७ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी चिंतेची बाब असून जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
३९ हजार हेल्थ वर्कर आणि फ्रंट लाईन वर्करला बूस्टर डोस
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १२३३२ हेल्थ वर्कर आणि २७६६१ फ्रंट लाईन वर्कर यांना पहिल्या टप्प्यात बूस्टर डोस देण्यात येणार आहे.