शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीसाठी पाणी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:35 IST

यंदा पावसाने दिलेल्या दग्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण नियोजनच फिस्टकले आहे. कमी पावसामुळे प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असून अशात रब्बीसाठी पाणी दिल्यास येणारा काळ कठीण जाणार आहे.

ठळक मुद्देपाण्याचे पिण्यासाठी आरक्षण : पाण्याअभावी यंदा रब्बीचा हंगाम धोक्यात

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा पावसाने दिलेल्या दग्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण नियोजनच फिस्टकले आहे. कमी पावसामुळे प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असून अशात रब्बीसाठी पाणी दिल्यास येणारा काळ कठीण जाणार आहे. यामुळेच प्रकल्पांतील पाण्याचे पिण्यासाठी आरक्षण करण्यात आले असून यंदा रब्बीसाठी पाणी दिले जाणार नाही. यावरून जिल्ह्यात रब्बीचा हंगाम धोक्यात दिसत आहे.जिल्ह्याला धानाचे कोठार अशी साजूक उपमा देण्यात आली आहे. वास्तविक प्रमुख पीकही धानच आहे. मात्र बदलत्या काळानुरूप निसर्गाचा लहरीपणा वाढला असून धानाच्या या कोठारात आता धानालाच ग्रहण लागू लागले आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण घटत चालले असून शेतीला फटका बसतच चालला आहे. परिणामी शेतकरी दारिद्रयात झोकला जात असतानाच धानाचे उत्पादनही घटत चालले आहे. यात धानच काय सर्वच शेती नेस्तनाबूत होऊ लागल्याचे भकास वास्तव आज जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी करून शेती करीत आहेत. मात्र पाऊस आपला रंग दाखवून त्यांचे जीवन बेरंग करीत आहे.परिणामी शेती महागडी होऊ लागली असून शेतकºयांचा निसर्गावरील भरवसा उठू लागला आहे. खरिपातही पावसाने आपला रंग दाखविला. त्यात पाटबंधारे विभागाने सिंचनाची सोय करून दिल्याने कितीतरी शेतकºयांचे पीक बचावले. पाटबंधारे विभागच देव बनून शेतकºयांसाठी धावून आल्याचे दिसून आले व नेहमी विभागाकडून सिंचनाची सोय केली जाते. याचेच फलीत आहे की, जिल्ह्यातील शेतकरी आजही पावसाच्या लहरीपणावर नव्हे तर पाटबंधारे विभागाच्या भरवशावर आपली शेती करीत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.यात रब्बीचा हंगाम तर पूर्णपणे पाटंबधारे विभागावरच अवलंबून असतो असे म्हणता येईल. यंदा मात्र पावसाने दगा दिल्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठी बघून पाटबंधारे विभाग शेतीला पाणी देण्यातबाबत हतबल दिसून येत आहे.प्रकल्पांतील पाणीसाठा बघता भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेत जिल्हाधिकाºयांनी पाणी पिण्यासाठी आरक्षीत करून सिंचनासाठी देण्यास मनाई केल्याचे आदेश काढले आहेत. यामुळे मात्र जिल्ह्यातील रब्बीचा हंगाम यंदा धोक्यातच दिसून येत आहे.बाघ प्रकल्पातून मदत नाहीबाघ प्रकल्पांतर्गत सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड प्रकल्प येतात. यातील सिरपूर व कालीसराड प्रकल्पांतील पाणी पुजारीटोला प्रकल्पाला दिले जाते. त्यानंतर पुजारीटोला प्रकल्पाच्या कालव्यांतून पाणी सोडले जाते. यात जिल्ह्यासह मध्यप्रदेश राज्यातही सिंचनाची सोय केली जाते. दरवर्षी १ जुलै ते ३१ आॅक्टोबर हा खरिपाचा हंगाम समजला जात असून ३१ आॅक्टोबर रोजी प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा बघून पुढचे नियोजन केले जाते. सध्या मात्र पुजारीटोला प्रकल्पात फक्त २५ टक्के पाणीसाठा आहे. पाणी कमी प्रमाणात असल्याने त्यातही रब्बीसाठी पाणी दिल्यास भविष्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार. हे लक्षात घेत जिल्हाधिकाºयांनी पाणीसाठा येत्या ३० जून २०१८ पर्यंत पिण्यासाठी आरक्षित केला असल्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुजारीटोला प्रकल्पातून यंदा रब्बीसाठी पाणी दिले जाणार नाही.इटियाडोहचा विषय पाणी वापर संस्थांकडेसन २००५ च्या कायद्यानुसार प्रकल्पांतील पाण्याचा वापर कसा करावा यासाठी पाणी वापर संस्थांचे गठन करायचे आहे. त्यानुसार, इटियाडोह प्रकल्पासाठी ५५ पाणी वापर संस्था आहेत. इटियाडोह प्रकल्पातून खरिपात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या दोन तालुक्यांना, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याला तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्याला सिंचन केले जाते. सध्या प्रकल्पात १०८.९८ दलघमी (३४ टक्के) पाणीसाठा आहे. यातील ४ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षीत असल्याने उर्वरीत १०४ दलघमी पाणी रब्बीसाठी घ्यायचे की नाही हा निर्णय पाणी वापर समितीचे अध्यक्ष ठरवणार आहेत. अद्याप त्यांची बैठक झालेली नसल्याने इटियाडोह प्रकल्पाची स्थिती स्पष्ट झालेली नाही.