शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

गावापर्यंत लालपरी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने ‘लॉकडाऊन’चे टप्पेही वाढत चालले असून अशात मात्र सुमारे २ महिने कडक ‘लॉकडाऊन’ करण्यात आले होते. या २ महिन्यांच्या काळात राज्य शासनाने रेल्वे, बस, उड्डाण व जल वाहतूकही बंद पाडली होती. मात्र याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर आणि राज्यातील नागरिकांच्या दैनंदिन जनजीवनावरही पडत होता.

ठळक मुद्देप्रतिसाद नाही : जेमतेम डिझेल खर्च निघतोय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दैनंदिन जनजीवन रूळावर आणण्यासाठी राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाला आता गावांपर्यंत फेऱ्यांची परवानगी १५ जूनपासून दिली आहे. मात्र जिल्ह्यात प्रवाशांचा प्रतिसादच नसल्याने सध्या तालुकास्थळापर्यंत सुरू असलेल्या फेऱ्यांचा जेमतेम डिझेल खर्च निघत असल्याची माहिती आहे. यामुळे जिल्ह्यात सध्यातरी गावापर्यंत लालपरी धावणार नाहीच अशी माहिती आहे.देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने ‘लॉकडाऊन’चे टप्पेही वाढत चालले असून अशात मात्र सुमारे २ महिने कडक ‘लॉकडाऊन’ करण्यात आले होते. या २ महिन्यांच्या काळात राज्य शासनाने रेल्वे, बस, उड्डाण व जल वाहतूकही बंद पाडली होती. मात्र याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर आणि राज्यातील नागरिकांच्या दैनंदिन जनजीवनावरही पडत होता. विस्कटलेली ही घडी पुन्हा बसविण्यासाठी राज्य शासनाने मे महिन्यात राज्य परिवहन महामंडळाला तालुकास्थळापर्यंत बस फेऱ्या सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार, जिल्ह्यात गोंदिया आगाराच्या ५० फेऱ्या सुरू असून यातून जेमतेम डिजेल खर्च निघत आहे. कोरोनाच्या दहशतीने नागरिक गावातल्या गावात किंवा परिसरातच आपली कामे आटोपून घेत असून बसने प्रवास करणे टाळत असल्याचे दिसत आहे. परिणामी बस फेऱ्यांना प्रतिसादच नाही. त्यात आता राज्य शासनाने सोमवारपासून (दि.१५) गावापर्यंत फेऱ्या सोडण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यात तालुकास्थळापर्यंतच्या फेऱ्यांनाच प्रतिसाद नसताना गावापर्यंत फेऱ्या चालवून काहीच फायदा निघणार नाही.उलट नुकसान होण्याचीच जास्त शक्यता दिसून येत आहे. नेमकी हीच बाब हेरून जिल्ह्यात सध्या तरी गावापर्यंत बस फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामुळेच गावापर्यंत लालपरी पोहचणार नसल्याचे दिसत आहे.रूग्ण संख्येने जिल्हावासी दहशतीतगोंदिया जिल्ह्यात सुरूवातीला १ रूग्ण निघाल्यानंतर सुमारे ३९ दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. त्यानंतर मात्र जिल्ह्यात स्फोटच झाला व ही आकडेवारी आजघडीला १०१ पर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यातील फक्त देवरी तालुक्यातून रूग्ण आढळून आले नसून उर्वरित ७ तालुक्यात रूग्ण मिळून आले आहेत. रूग्ण वाढीची ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हावासी दहशतीत आले आहेत. त्यामुळे गावातून बाहेर निघणे व त्यातल्या प्रवास करण्याचा धोका सर्वच टाळत आहेत. परिणामी एसटी फेऱ्यांना प्रतिसाद नाही.

टॅग्स :state transportएसटी