आदर्श शिक्षकासाठी सहा तालुक्यांचे प्रस्तावच नाही

By Admin | Updated: September 4, 2014 23:53 IST2014-09-04T23:53:40+5:302014-09-04T23:53:40+5:30

आदर्श शिक्षक या पुरस्कारप्राप्त शिक्षकाला एक वेतनवाढ दिली जात होती. त्यामुळे अनेकांची या पुरस्कारासाठी चढाओढ होती. मात्र मागील दोन वर्षांपासून शासनाने आदर्श शिक्षकाला एक वेतनवाढ देण्याचे

There is no proposal for six teachers for the ideal teacher | आदर्श शिक्षकासाठी सहा तालुक्यांचे प्रस्तावच नाही

आदर्श शिक्षकासाठी सहा तालुक्यांचे प्रस्तावच नाही

शिक्षक दिन : ११ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
गोंदिया : आदर्श शिक्षक या पुरस्कारप्राप्त शिक्षकाला एक वेतनवाढ दिली जात होती. त्यामुळे अनेकांची या पुरस्कारासाठी चढाओढ होती. मात्र मागील दोन वर्षांपासून शासनाने आदर्श शिक्षकाला एक वेतनवाढ देण्याचे बंद केल्याने आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील सहा तालुक्यांत उदासिनता दिसून आली आहे.
शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराने शासन गौरव करतो. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचा गौरव करण्याकरीता दरवर्षी जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव मागविण्यात येते. त्यानुसार यावर्षीही अर्ज मागविण्यात आले. परंतु शासनाने आदर्श शिक्षकांना एक वेतनवाढ देण्याचे बंद केल्यामुळे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये असलेल्या सहा तालुक्यातील शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्जचं केले नाही. प्राथमिक विभागातील शिक्षकांनी मात्र प्रत्येक तालुक्यातून अर्ज केले आहेत.
यंदा गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे ११ शिक्षकांना शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. यात प्राथमिक विभागात गोंदिया तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा रजेगाव येथील श्रीमती पी.पी.रणदिवे, गोरेगाव तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा हिरडामाली येथील यशवंत श्यामलाल भगत, तिरोडा तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा वडेगाव येथील मुख्याध्यापक चुन्नीलाल भाऊजी बोपचे, सडक/अर्जुनी तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा तिडका येथील मनोहर सोनू डोंगरे, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा अरततोंडी येथील के.ए. मेश्राम, देवरी तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंडकेपार येथील सुरेश गजानन कश्यप, सालेकसा तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा बाकलसर्रा येथील एम.एस. नागपुरे, आमगाव तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पदमपूर येथील शोभा देवेंद्रसिंह मच्छीरके, कला/संगीत विशेष पुरस्कार गोंदिया तालुक्यातून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा कटंगीटोला येथील जयश्री निलकंठ सिरसाटे यांना देण्यात येणार आहे. तर माध्यमिक विभागातून आमगाव जि.प. शाळेतील महेंद्र भुवराज सोनवाने व जि.प. हायस्कूल कावराबांध येथील टी.बी. बावनकुळे यांना देण्यात येणार आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: There is no proposal for six teachers for the ideal teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.