मृत्यूचे भय नाही गावाला पोहचायच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:22+5:30
डोक्यावर चिमुरडे व जिवन प्रपंचाचे ओझे वाहत हे तांडे दररोज प्रवास करीत आहेत. ना शुद्ध पिण्याचे पाणी, ना पोटभर खायला अन्न तरी दरमजल करत गावाची ओढ त्यांना सतावित आहे. शुक्र वारी (दि.८) अचानक अर्जुनी मोरगाव-वडसा मार्गावर एका स्थलांतरित मजुरांच्या तांड्याची भेट झाली. दुपारच्या प्रहरी सूर्य आग ओखत होता. रखरखते उन्ह होती. माँ पेट्रोल पंपसमोर एक तांडा येऊन थबकला.सर्वांग घामानं भिजलेलं होत.

मृत्यूचे भय नाही गावाला पोहचायच
संतोष बुकावन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : देशात अगदी पहिला लॉकडाऊन लागू झाला तेव्हापासून तर आजतागायत स्थलांतरित मजुरांच्या तांडयांचे आवागमन सुरूच आहे. हजार-बाराशे कि.मी.पायी चालत त्यांच मार्गक्रमण सुरू आहे. आम्हाला मृत्यूच भय नाही, बस कोणत्याही परिस्थितीत गावाला पोहचायचय अशा मजुरांच्या प्रतिक्रि या आहेत.
डोक्यावर चिमुरडे व जिवन प्रपंचाचे ओझे वाहत हे तांडे दररोज प्रवास करीत आहेत. ना शुद्ध पिण्याचे पाणी, ना पोटभर खायला अन्न तरी दरमजल करत गावाची ओढ त्यांना सतावित आहे. शुक्र वारी (दि.८) अचानक अर्जुनी मोरगाव-वडसा मार्गावर एका स्थलांतरित मजुरांच्या तांड्याची भेट झाली. दुपारच्या प्रहरी सूर्य आग ओखत होता. रखरखते उन्ह होती. माँ पेट्रोल पंपसमोर एक तांडा येऊन थबकला.सर्वांग घामानं भिजलेलं होत. पायाच्या पोटरीत गोळे व फोड आलेली होती.
डांबरी रस्त्याने चालून चालून पादत्राणे झिजली होती. थकलेले पाय व क्षीण झालेले शरीर, अंगात कुठलेही त्राण नव्हते. त्यांच्या या वेदना पाहवत नव्हत्या. बल्लारशा-गोंदिया या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मजुरांच्या तांड्यातील एकाचा सौंदड नजीक रेल्वे धडकेत मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि.८) औरंगाबादजवळ रेल्वे अपघातात १६ मजुरांचा मृत्यू झाला.मजुरांचे हे मृत्यू तांडव सुरूच आहे. तांड्यात फिजीकल डिस्टन्स पाळले जात नसल्याने या मजुरांना कोरोना विषाणू संक्र मणाची भीती आहे. अंर्तमनात भीती असली तरी त्यांचा निर्धार एकच आहे मातृभूमीला स्पर्श करण्याचा. सीमेपार मरण्यापेक्षा गावात मेल्यावर सगेसोयरे तरी धावून येतील असा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्यात आहे. याच भरोश्यावर ते शेकडो कि.मी.चा प्रवास करुन गावाकडे परतत आहे.
स्वयंसेवी संस्थाच आमचा आधार
लॉकडाऊनमुळे हैद्राबाद व इतर राज्यात अडकलेले मजूर आता पायीच आपल्या गावाकडे परतत आहे. रोजगार गेल्याने आणि कंपनी मालकाने सुध्दा हातावर केल्याने त्यांच्याजवळ उदरनिर्वाहासाठी पैसे नाही. अशात शेकडो कि.मी.च्या पायी प्रवासात या मजुरांना स्वंयसेवी आणि सामाजिक संस्थाकडून मदत होत आहे. कुणी जेवणाची तर कुणी पैशाची मदत करीत आहेत. त्यामुळे स्वयंसेवी संस्थाच आमचा आधार असल्याचे हे स्थलांतरीत मजूर सांगत आहेत.
ऑनलाईन नोंदणी करणे ठरते अडचण
शासनाने विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या स्वगृही सोडण्यासाठी रेल्वे गाड्या आणि बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी मजुरांना नोंदणी करावी लागत आहे. मात्र बºयाच मजुरांना याची माहिती नसल्याने आणि आॅनलाईन प्रक्रिया ही किचकट असल्याने त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
आमचा गावच बरा
लॉकडाऊन लागू झाला. कंपनीच्या मालकाने कामावरुन काढले. बेरोजगारी व उपासमारीचे संकट ओढवले. लॉकडाऊन उघडेल म्हणून काही दिवस वाट पाहिली. लॉकडाऊन उघडलेच नाही.शेवटी कुटुंबासह गावाकडे जाण्याचे ठरविले. सीमाबंदीमुळे कोरोनाच्या भयापेक्षा रस्त्यावरची भीती वाटू लागली. आता एकदा परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. काहीही झाले तरी चालेल पण गावाकडे जाऊच.
- प्रकाश पटेल, भलपहारी ( छत्तीसगड)
प्रवासात महायातना
लॉकडाऊनमुळे दुकाने बंद. सोबत लहान लेकरं. सामानाचं ओझं वाहून नेणं अवघड आहे. खिशात पैसा नाही. खायला अन्नधान्य नाही. मिळेल ते खायचं व पुढे जायचं. रात्री ८ वाजतापासून प्रवास करायचा. दुपारी विश्रांती करायची. पुन्हा ६ वाजता निघायचं. जिथे रात्र होईल तिथे थांबायचं. पायावर गोळे, सूज असते पण वेदना सांगायच्या कुणाला? इकडंतिकडं मरण्यापेक्षा आपल्या गावातच मरू. निदान सगेसोयरे तर अंतिमसंस्कार करतील. यापुढे अशा यातना नको रे बाबा.
- गोपाल मिसाद, बालाघाट (मध्यप्रदेश)