सालेकसाच्या १२५ शाळेत पंतप्रधानाचे भाषण ऐकण्याची सुविधा नाही

By Admin | Updated: September 3, 2014 23:31 IST2014-09-03T23:31:21+5:302014-09-03T23:31:21+5:30

शिक्षक दिनच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शाळेतील विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण संदेश देणार आहेत, असे पत्र शिक्षण विभागाला आॅगस्ट महिन्यात आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी

There is no facility of listening to the speech of the Prime Minister in 125 schools of Salekasa | सालेकसाच्या १२५ शाळेत पंतप्रधानाचे भाषण ऐकण्याची सुविधा नाही

सालेकसाच्या १२५ शाळेत पंतप्रधानाचे भाषण ऐकण्याची सुविधा नाही

सालेकसा : शिक्षक दिनच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शाळेतील विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण संदेश देणार आहेत, असे पत्र शिक्षण विभागाला आॅगस्ट महिन्यात आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पाठविले आहे.भाषण ऐकण्यासाठी टी.व्ही.संच, विद्युत पुरवठा, जनरेटर, ईनव्हर्टर या साधनांची आवश्यकता असते. परंतु तालुक्यातील १२५ शाळेत या सुविधा उपलब्ध नाहीत. तेव्हा या शाळेतील विद्यार्थ्यानी काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शाळेत टी.व्ही. नसेल तर मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडून उसनवारीवर टी.व्ही. संच आणण्याचे सूचना पत्रात म्हटले आहे.
सालेकसा तालुक्यातील ९० टक्के जि.प. शाळेत टि.व्ही.ची सोय नाही. त्यातही ९० टक्के शाळेतील विद्युत पुरवठा भरमसाठ विद्युत बिलामुळे खंडीत करण्यात आला आहे. जेथे विजेचे बिल भरायला पैसे तेथे भाड्याने टि.व्ही. आणणे, जनरेटर आणणे कसे शक्य होणार आहे. काही गावात अजूनपर्यंत टि.व्ही. पोहचलेला नाही. विद्यार्थ्यांना पंतप्रधानाचे भाषण कसे ऐकायला मिळणर असा प्रश्न निर्माण होतो. काही शाळेत २० पर्यंतच विद्यार्थी पटसंख्या आहे. तेव्हा पंतप्रधानाची इच्छा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याची असेल परंतु उपलब्ध साधनांच्या अभावी तालुक्यातील १२५ शाळापर्यंत पंतप्रधानाचे भाषण विद्यार्थी ऐकू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रातील अनेक शाळा अजूनही मुलभूत सुविधापासून वंचित आहे. या क्षेत्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: There is no facility of listening to the speech of the Prime Minister in 125 schools of Salekasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.