शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हील लाईन्स परिसरात आता दोन कंटेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

सिव्हील लाईन्स परिसर दाट लोकवस्ती व रात्रंदिवस वर्दळीचा हा भाग आहे. अशात आता येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने सिव्हील लाईन्सवासी दहशतीत वावरत आहेत. सध्या या दोन्ही भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरील व्यक्तींचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. शासनाकडून करण्यात येणाऱ्या सर्वच उपाययोजन केल्या जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना रू ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच सिव्हील लाईन्स परिसरात रूग्ण वाढल्याने आता येथे २ कंटेन्मेंट झोन झाले आहेत.कोरोनाच्या सुरूवातीलाच २७ मार्च रोजी कोरोनाचा एक रूग्ण शहरात आढळला होता. त्यानंतर मात्र गोंदिया शहर सुरक्षित होते. पण मागील महिन्यात कुंभारेनगरात कोरोनाचा उद्रेक झाला. शहरात कोरोनाने पुन्हा प्रवेश केला. शहरातील कुंभारेनगर कोरोनाचे हॉट स्पॉट बनत असतानाच त्यानंतर गोविंदपूर परिसरातही कोरोना रूग्ण आढळÞून आला होता. एवढेच नव्हे तर आता शहरातील मुख्य भाग समजल्या जाणाऱ्या सिव्हील लाईन्स परिसरातही कोरोनाचा शिरकाव झाला.हैदराबाद येथून आले ३ रूग्ण आढळल्याने सिव्हील लाईन्स हनुमान चौक सध्या कंटेन्मेंट झोनमध्ये आला आहे. त्यानंतर आता येथून थोडे पुढे गेल्यावर इंजिनशेड शाळा परिसरात बिलासपूर येथून आलेली एक व्यक्ती बाधित आढळून आली आहे.यामुळे सिव्हील लाईन्समधील आता हे दुसरे कंटेन्मेंट झोन झाले आहे.सिव्हील लाईन्स परिसर दाट लोकवस्ती व रात्रंदिवस वर्दळीचा हा भाग आहे. अशात आता येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने सिव्हील लाईन्सवासी दहशतीत वावरत आहेत. सध्या या दोन्ही भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरील व्यक्तींचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. शासनाकडून करण्यात येणाऱ्या सर्वच उपाययोजन केल्या जात आहेत.उपाययोजनांच्या अंंमलबजावणीची गरजशासनाकडून नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर तसेच अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास घरातून बाहेर निघण्याबाबत सांगितले जात आहे. मात्र नागरिक या सर्व उपाययोजनंकडे दुर्लक्ष करीत आपल्या मर्जीने वावरताना दिसत आहे. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे झाले आहे. यासाठी आता सिव्हील लाईन्सवासीयांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या