जिल्ह्यात अतिसाराचे ३०७ रुग्ण

By Admin | Updated: August 12, 2014 23:48 IST2014-08-12T23:48:53+5:302014-08-12T23:48:53+5:30

पावसाळ्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करून जिल्ह्यात कुठे डायरियाची साथ तर पसरली नाही ना याची तपासणी करण्यात आली. त्यात गोरेगाव तालुक्यात

There are 307 cases of diarrhea in the district | जिल्ह्यात अतिसाराचे ३०७ रुग्ण

जिल्ह्यात अतिसाराचे ३०७ रुग्ण

गोरेगाव तालुक्यात सर्वाधिक : आशा स्वयंसेविकांनी घेतल्या ६५ हजार बालकांच्या भेटी
गोंदिया : पावसाळ्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करून जिल्ह्यात कुठे डायरियाची साथ तर पसरली नाही ना याची तपासणी करण्यात आली. त्यात गोरेगाव तालुक्यात डायरियाचे सर्वाधिक रूग्ण आढळले. संपुर्ण जिल्ह्यात यावर्षी ३०७ डायरियाच्या रूग्णांची नोंद करण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ८४ हजार ९३८ बालकांच्या घरी भेटी देवून त्यांना डायरियाची लागन झाली आहे का याची शहनिशा करून घेण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यापैकी ६५ हजार ८०० बालकांपर्यंत आशा स्वयंसेविका आजतागायत पोहचल्या. यात डायरियाचे ३०७ संशयीत रूग्ण आढळले. तर १० रूग्ण डायरियाचे पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. केंद्रशासनाने ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ओआरएस चे पॅकेट वितरीत करण्याचे निर्देश दिले.
मात्र त्यांनी ओआरएस चे पॅकेटच पाठविले नसल्याने महाराष्ट्र सरकारने या अतिसार पंधरवाड्याची मुदत पुढे ढकलून ३० आॅगस्ट पर्यंत केली आहे. आमगाव तालुक्यात ९ हजार ३८ बालकांची तपासणी करण्याचे उद्दीट्ये होते. यापैकी ६ हजार ५७५ बालकांना भेटी देण्यात आल्या. १३३९ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. परंतु भेटी लिेल्या बालकांत एकही मूल डायरियाने ग्रसीत आढळला नाही.
सालेकसा तालुक्यात ४ हजार ५१९ बालकांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट्य होते. यापैकी ५ हजार ४९५ बालकांना भेटी देण्यात आल्या. ९९९ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. यात डायरियाचे ४३ संशयित रूग्ण होते. देवरी तालुक्यात ९ हजार २८५ बालकांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट्य होते. यापैकी ६ हजार ७७५ बालकांना भेटी देण्यात आल्या. ८५२ बालकांना ओआरएसची पाकिटे वाटप करण्यात आली. यात डायरियाचे ५ रूग्ण संशयित आढळले.
सडक/अर्जुनी तालुक्यात ८ हजार ३५३ बालकांपैकी ४ हजार ७५० बालकांच्या भेटी घेण्यात आल्या. २००४ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. यात डायरियाचे १ रूग्ण संशयित आढळला. अर्जुनी/मोरगाव तालुक्यात ९ हजार ७०९ बालकांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट्य होते.
यापैकी ९ हजार ८५४ बालकांना भेटी देण्यात आल्या. १५०५ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. यात डायरियाचे रूग्ण आढळले नाही. गोरेगाव तालुक्यात ९ हजार १३१ बालकांपैकी ७ हजार ४१२ बालकांच्या भेटी घेण्यात आल्या. ३५९२ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. यात डायरियाचे १३९ रूग्ण संशयित आढळले.
गोंदिया तालुक्यात २३ हजार ६९८ बालकांची तपासणी करण्याचे उद्दीष्ट्य होते. यापैकी १९ हजार ८१५ बालकांना भेटी देण्यात आल्या. ६१३३ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. यात डायरियाचे ४६ रूग्ण संशयित आढळले. ८ रूग्ण डायरियाचे पॉझिटीव्ह आढळले. तिरोडा तालुक्यात ११ हजार २०५ बालकांपैकी ५ हजार १२४ बालकांच्या भेटी घेण्यात आल्या. त्यातील ११६६ बालकांना ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात आले. डायरियाचे ७३ रूग्ण संशयित आढळले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: There are 307 cases of diarrhea in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.