शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

सस्पेन्स संपला, गोंदियात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट; भाजप, राकाँकडून कोण आहे रिंगणात?

By अंकुश गुंडावार | Updated: November 17, 2025 13:29 IST

Gondia : सर्वच पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर करुन एबीफार्म देण्याचे नियोजन केले होते.

गोंदिया : नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारीवरुन गेल्या दहा दिवसांपासून सस्पेन्स कायम होता. हा सस्पेन्स अखेर सोमवारी (दि.१७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाला आहे. गोंदिया नगर परिषद  नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून कशिश जयस्वाल तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ. माधुरी नासरे आणि काँग्रेसकडून सचिन शेंडे तर शिंदेसेनेकडून डॉ. प्रशांत कटरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता मंगळवारपासून निवडणुकीच्या  रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. 

सर्वच पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर करुन एबीफार्म देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार काही अपेक्षित उमेदवारांना संधी मिळाली तरी काहींची भ्रमनिराशा झाल्याने ऐनवेळी बंडखोरी करीत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाकडून आ. विनोद अग्रवाल व डाॅ. परिणय फुके यांच्या मर्जीतले माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली. तर आम आदमी पार्टीकडून उमेश दमाहे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे जेष्ठ नेते राहिलेले डाॅ. प्रशांत कटरे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिंदेसेनेचे आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करुन सोमवारी शिंदेसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या डॉ. माधुरी नासरे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. तर काँग्रेसनेऐनवेळी माजी नगरसेवक सचिन शेंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करुन घेत त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. एकंदरीत सर्वच  प्रमुख पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

कटरे यांना दुसऱ्यांदा डावलल्याची चर्चा 

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आरोग्य भारतीचे गोंदिया जिल्हा प्रमुख डाॅ. प्रशांत कटरे यांना भारतीय जनता पक्षाच्या नागपूर व गोंदिया जिल्ह्यातील आ. नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीतही डावलले होते. त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदाकरीता पक्षाकडे अर्ज करुन उमेदवारी मागितली. परंतु पक्षाच्या नागपूर, गोंदिया व देवरीतील नेत्यांनी निष्ठावंत व नवीन चेहरा असलेल्या डाॅ.प्रशांत कटरे यांना नकार दिल्याची चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gondia Municipal President Candidates Finalized: BJP, NCP, Congress, and Shinde Sena Field Candidates.

Web Summary : Gondia's municipal election picture is clear. BJP, NCP (Ajit Pawar), Congress, and Shinde Sena announced their candidates for the president post. The election battle begins.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकZP Electionजिल्हा परिषद