शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या मागणीला घेवून संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप

By अंकुश गुंडावार | Updated: August 9, 2023 16:15 IST

शिक्षण विभागाचे वेळकाढू धोरण : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : शिक्षक मिळेपर्यंत कुलूप उघडणार नाही

मोहाडी-चोपा : गोरेगाव तालुक्यातील चोपा येथील जि.प.शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी वांरवार करुनही शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी बुधवारी (दि.९) शाळेला कुलूप ठोकले. तसेच जोपर्यंत शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही अशी भुमिका पालकांनी घेतली आहे.

चोपा येथील जि.प.प्राथमिक शाळेत सत्र २०२३-२४ मध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ६१ आहे. या पटसंख्येवर ३ शिक्षक मंजूर आहे. मागील सत्राच्या संचमान्यतेनुसार २ शिक्षक पात्र आहेत, असा अहवाल देवून गोरेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी येथील एका शिक्षकाची तात्पुरती नेमणूक निंबा येथील शाळेत केली. यामुळे पालकांनी रोष व्यक्त करुन २५ जुलै रोजी पालक सभा घेवून आमच्या शाळेचा शिक्षक आम्हाला परत करा असा ठराव घेतला. तसेच दूरध्वनीवरुन पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना विचारणा केली.

पदाधिकाऱ्यांनी १० दिवसात शिक्षकाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या सांगण्यावरुन पालकांनी १० दिवस कोणतीही कार्यालयीन टपाल देण्यात येणार नाही असा निर्णय घेत त्यासंबंधिचे पत्र गटशिक्षणाधिकारी व सभापती यांना दिले. पण शिक्षण विभाग व पंचायत समितीने दिलेल्या आश्वासनाची पुर्तत: न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या चोपा येथील पालकांनी बुधवारी सकाळी एकत्र येत शाळेला कुलूप ठोकले. तसेच जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती करण्यात येत नाही तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही अशी भुमिका घेतली आहे.

पालक सभा घेवून ठोकले कुलूप

गटशिक्षणाधिकारी व पं.स.सभापती यांनी दहा दिवसात शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. पण याला दिवसाचा दहा दिवसाचा लोटूनही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पालकांनी बुधवारी पालक सभा घेवून जोपर्यंत चोपा शाळेत शिक्षक नियुक्त करण्यात येत नाही तोपर्यंत शाळेला कुलूपबंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शाळेला कुलूप ठोकले.

जोपर्यंत आमच्या गावातील शाळेतून प्रतिनियुक्तीवरुन पाठविलेल्या शिक्षकाला परत चोपा शाळेत नियुक्त करण्यात येत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडू देणार नाही.

- समस्त पालक चोपा

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळाgondiya-acगोंदियाTeacherशिक्षक