टेन्शन वाढले ! जिल्ह्यात दोन बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST2021-12-13T05:00:00+5:302021-12-13T05:00:25+5:30
तिरोडा येथील बाधितांना सुटी देण्यात आली. त्यानंतर आमगाव व सालेकसा येथील बाधितांनाही सुटी देणयात आली असतानाच अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एक बाधित आढळून आला. यामुळे शनिवारी जिल्ह्यात फक्त एक ॲक्टिव्ह रुग्ण होता. मात्र, रविवारी (दि. १२) जिल्ह्यात आमगाव व सालेकसा तालुक्यांत प्रत्येकी एक बाधित आढळून आला असून, आता जिल्ह्यात तीन ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत.

टेन्शन वाढले ! जिल्ह्यात दोन बाधितांची भर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शनिवारी जिल्ह्यातील एका बाधित रुग्णाने कोरोनावर मात केल्याने त्याला सुटी देण्यात आली. यानंतर जिल्ह्यात फक्त एक ॲक्टिव्ह रुग्ण होता व त्यामुळे दिलासादायक स्थिती होती. मात्र, रविवारी (दि. १२) जिल्ह्यातील आमगाव व सालेकसा तालुक्यांत प्रत्येकी एक बाधित आढळून आले असल्याने टेन्शन वाढले आहे. त्यानंतर आता जिल्ह्यात तीन ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत.
मध्यंतरी तिरोडा तालुक्यात एकदम सात बाधित आढळून आले होते. त्यानंतर सालेकसा व आमगाव तालुक्यातही बाधित आढळल्याने कोरोना पाय पसरतो काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, तिरोडा येथील बाधितांना सुटी देण्यात आली. त्यानंतर आमगाव व सालेकसा येथील बाधितांनाही सुटी देणयात आली असतानाच अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एक बाधित आढळून आला. यामुळे शनिवारी जिल्ह्यात फक्त एक ॲक्टिव्ह रुग्ण होता. मात्र, रविवारी (दि. १२) जिल्ह्यात आमगाव व सालेकसा तालुक्यांत प्रत्येकी एक बाधित आढळून आला असून, आता जिल्ह्यात तीन ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत.
केल्या होत्या ३५८ चाचण्या
- शनिवारी जिल्ह्यात ३५८ चाचण्या करण्यात आल्या यामध्ये ३४१ आरटी-पीसीआर, तर १७ रॅपिड ॲंटिजन चाचण्या आहेत. या चाचण्यांमध्येच हे दोन बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६८६१८ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये २४४७५६ आरटी-पीसीआर, तर २२३८६२ रॅपिड ॲंटिजन चाचण्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१२३७ नागरिक कोरोना बाधित झाले आहेत.
लवकरात लवकर लस घ्या
- कोरोनाची लस गंभीर संसर्गापासून वाचवीत असल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. यामुळेच जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यानंतरही कित्येक नागरिकांनी लस घेतलेली नाही, तर कित्येकांनी त्यांचा दुसरा डोस टोलवला आहे. लस घेतलेल्यांना कोरोनाचा गंभीर संसर्ग होत नसल्याने कोरोनापासून बचावासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे.