आॅनलाईन अर्जाने वाढविले शेतकºयांचे टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:00 IST2017-08-28T21:59:49+5:302017-08-28T22:00:23+5:30

शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले.

Tension of farmers increased by online application | आॅनलाईन अर्जाने वाढविले शेतकºयांचे टेंशन

आॅनलाईन अर्जाने वाढविले शेतकºयांचे टेंशन

ठळक मुद्देहजारो शेतकºयांना फटका : मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न नसल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले. त्यातच मोबाईल क्रमांक आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक असून ते नसल्याने अर्ज स्विकारले जात नसल्याने शेतकºयांना अर्ज न भरताच परत जावे लागत असल्याचे चित्र सेतू केंद्रावर आहे.
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत या योजनेचा लाभ दिला जात आहे. यासाठी पात्र शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले आहे.
यासाठी शेतकºयांना आधारकार्डसह मोबाईल क्रमांक संलग्न करणे आवश्यक आहे. मात्र याची माहिती बºयाच शेतकºयांना नसल्याने त्यांना ई-महासेवा केंद्रावरुन अर्ज भरताच परत जावे लागत आहे. कर्जमाफीची आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतू व ई महासेवा केंद्रान जे सॉफ्टवेयर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यात मोबाईल क्रमांक आधारकार्डसह सलग्न असल्याशिवाय अर्ज अपलोड होत नाही.
जिल्ह्यात एकूण ६९ हजार ३६६ कर्जदार शेतकरी असून यापैकी आत्तापर्यंत केवळ ३१ हजार २७१ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले. अर्ध्यापेक्षा अधिक शेतकरी अद्यापही आॅनलाईन अर्ज करण्यापासून वंचित आहेत. आॅनलाईन अर्ज करताना शेतकºयांना विविध अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर असल्याने सध्या जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर शेतकºयांची गर्दी आहे. याच गर्दीचा फायदा काही ई-सेवा केंद्र संचालक घेत असल्याचे चित्र आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया फारच किचकिट असल्याने बरेच शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना भूर्दंड
शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य केले आहे. यासाठी सेतू व ई-महासेवा केंद्राना शेतकºयांकडून अर्ज भरण्यासाठी कुठलेही शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यानंतरही काही ठिकाणी शेतकºयांकडून अर्ज भरण्यासाठी शंभर रूपये घेतल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.

अर्ज भरण्यासाठी शासनाने जे साफ्टवेयर उपलब्ध करुन दिले आहे. त्यात आधारकार्डसह मोबाईल क्रमांक संलग्न असल्याशिवाय अर्ज अपलोड होत नाही. त्यामुळे अडचण येत आहे.
-दुलिचंद निखाडे, सेतू केंद्र संचालक, दासगांव

कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे शेतकºयांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आधारकार्डसह संलग्न करुन योजनेचा लाभ घ्यावा.
-अनंत वालस्कर, उपविभागीय अधिकारी, गोंदिया

Web Title: Tension of farmers increased by online application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.