आदर्श नागरिक घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षकांच्या हाती
By Admin | Updated: July 19, 2015 01:32 IST2015-07-19T01:32:36+5:302015-07-19T01:32:36+5:30
शिक्षकांच्या चिती अवघ्या विद्यार्थ्यांची व्याप्ती, या उक्तीनुसार शिक्षक हा सतत धडपडणारा असावा.

आदर्श नागरिक घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षकांच्या हाती
विजय सूर्यवंशी : सहयोग शिक्षक मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा
गोंदिया : शिक्षकांच्या चिती अवघ्या विद्यार्थ्यांची व्याप्ती, या उक्तीनुसार शिक्षक हा सतत धडपडणारा असावा. हाच ध्यास शिक्षकांचा असावा. विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळा व गावचा कायापालट होऊ शकते. क्रियाशिल शिक्षकांच्या माध्यमातून तसेच विविध समूहाकडून उत्तुंग कार्य महाराष्ट्रात केले जात आहे. नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा, वैयक्तिक सांघिक खेळ यामधून आदर्श नागरिक, अधिकारी घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षकांच्या हाती आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले.
सहयोग शिक्षक मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुरूवारी (दि.१६) कार्यालयात चर्चा करताना ते बोलत होते. प्रधान सचिव शालेय शिक्षण महाराष्ट्र नंदकुमार यांच्या सहविचार सभेत सहयोग शिक्षक मंचच्या विविध शैक्षणिक, सामाजिक कार्यावर चर्चा करण्यात आली. यावेळीे सहयोग शिक्षक मंचासोबत डॉ. सूर्यवंशी यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
चर्चेत सहयोगमार्फत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. वक्तृत्व, निबंध व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, बेटी बचाव, बेटी पढाओ अंतर्गत ४० दाम्पत्यांचा सत्कार हे कार्यक्रम स्तूत्य असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर येथे ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’, ‘अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा’, पीएचसी कायापालट, मॅथ कमांडो, असे विविध उपक्रम राबविले. यात ५००० शिक्षकांमधून ५०० शिक्षक गणितात तरबेज बनवून मॅथ कमांडो मार्फत सर्वांना प्रशिक्षण दिले. पीएचसी कायापालट मध्ये सर्व जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांचा गट बनवून प्रभावी कार्य केले. त्यास सध्या राज्य शासनाने मॉडेल म्हणून स्विकारले आहे. येथील स्व. खे. मंडळाच्या अधिकाऱ्यांची लवकरच सभा घेवून विद्यार्थ्यांना हितावह बदल करून वैयक्तिक खेळास विशेष प्राधान्य देण्यात येईल. जिल्ह्यात गाव तेथे वाचनालय उपक्रम राबविण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. नवोदय व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेसाठी नियोजन करणार असल्याचे सांगितले. चर्चेला आर.आर. अगडे, अध्यक्ष एच.एस. शहारे, सचिव युवराज माने, अशोक चेपटे, युवराज बडे, अरविंद कोटरंगे, विजेंद्र केवट, जी.पी. बिसेन, श्रीकांत कामडी, किशोर गर्जे, प्रमोद बघेले, एन.आर. शिरसाट, बी.पी. दराडे, शिवाजी बडे, वाय.बी. पटले, मुरकुटे, संदीप सोमवंशी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)