शिक्षकांनी सुजाण नागरिक घडवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:28+5:30
शिक्षक भारतीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सी.बी. पाचोळे यांचाही सत्कार करण्यात आला. जूनी पेंशन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण,जिल्हा सरचिटणीस प्रमेश बिसेन, विभागीय उपाध्यक्ष गुलाब मौदेकर, केंदप्रमुख रहमतकर, जे. डी. मेश्राम, संतोष डोंगरे उपस्थित होते. प्राचार्य मेश्राम यांनी, कमी पटसंख्या असलेल्या शाळा पूर्ववत सुरू झाल्या पाहिजेत व ग्रामीण भागातील आरटीआय कायद्यात दुरुस्ती व्हावी असे सांगीतले.

शिक्षकांनी सुजाण नागरिक घडवावे
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : शिक्षक विद्यार्थ्यांचा भाग्य विधाता असतो. शिक्षकांच्या मार्गदर्शनातूनच उद्याची पिढी घडणार असून शिक्षकांनी सुजान नागरिक घडवावे असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
शिक्षक भारतीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सी.बी. पाचोळे यांचाही सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य कमलबापू बहेकार, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरडे, महेंद्र सोनवणे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष डी.टी.कावळे, जूनी पेंशन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण,जिल्हा सरचिटणीस प्रमेश बिसेन, विभागीय उपाध्यक्ष गुलाब मौदेकर, केंदप्रमुख रहमतकर, जे. डी. मेश्राम, संतोष डोंगरे उपस्थित होते. प्राचार्य मेश्राम यांनी, कमी पटसंख्या असलेल्या शाळा पूर्ववत सुरू झाल्या पाहिजेत व ग्रामीण भागातील आरटीआय कायद्यात दुरुस्ती व्हावी असे सांगीतले.
संचालन रोहित हत्तीमारे यांनी केले. प्रास्ताविक जितेंद्र घरडे यांनी मांडले. आभार प्रथमेश बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी संतोष कुसराम, आनंद सोनवणे, माणिकचंद बिसेन, एम.झेड. नांदगाये, पंधरे, विलास डोंगरे, चुटे, लक्ष्मी रहांगडाले, एम. एस. बिसेन, संजय तुरकर, जसपालसिंग चक्रेल, गुलाब मौदेकर, राजू टेंभरे, भंडारी चौधरी, नरेश कोरे, सी.डी.भांडारकर, नलीनी नागरिकर, रामभगत पाचे, गणेश शिवणकर, एन. के .कटरे, विकेश डोंगरे, ममता चुटे यांनी सहकार्य केले.