शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

शिक्षकांनी केला जि.प.च्या अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 21:14 IST

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आज (दि.३१) रोजी घेराव केला. वेतनाची समस्या न सोडविल्यास ५ सप्टेंबरला होणाºया शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देवेतन न झाल्याने आक्रोश : शिक्षक दिन कार्यक्रमावर बहिष्काराचा इशारा, थकीत वेतन द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आज (दि.३१) रोजी घेराव केला. वेतनाची समस्या न सोडविल्यास ५ सप्टेंबरला होणाºया शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.दर महिन्याला १ तारखेला वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाने जिल्हा परिषद अध्यक्षासोबत चर्चा केली. त्यांनी दोन दिवसात या प्रकरणाचा निपटारा करू असे सांगितले. परंतु त्यांच्या आश्वासनांवर शिक्षण विभागाने काम पूर्ण केले नाही. जुलै महिन्याचे वेतन आॅगस्ट महिना संपूनही वेतन झाले नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि.३१) महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचा घेराव करण्यात आला. वेतन न झाल्यामुळे बँकेचे हप्ते, पतसंस्थेतून घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे शिक्षकांत असंतोष आहे. शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सभा घेऊन घेराव केला. या घेराव आंदोलनात तोडगा न निघाल्यास जिल्हा परिषदेतर्फे ५ सप्टेंबरला होणाºया शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिला. दरम्यान शिक्षकांच्या आंदोलनाला जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी भेट देवून त्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. तसेच शिक्षकांचे थकीत वेतन काढण्याचे आश्वासन दिले.आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे,विभागीय प्रमुख नूतन बांगरे, जिल्हा सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम, कार्याध्यक्ष यु.पी.पारधी, सुधीर बाजपेयी, नागसेन भालेराव, केदार गोटेफोडे, सुरेश रहांगडाले, एन.जे. रहांगडाले, के.एल. कटरे, एस.डी. पटले, शंकर नागपुरे, डी.झेड. लांडगे, जी. जी. दमाहे, देवेंद्र कोल्हे, पी.के. पटले, सी.एस. कोसरकर, पी.के. लोथे, प्रदीप गिºहेपुंजे, डी. आर. बनकर, एम.जी. नाकाडे, एल.टी. करंजेकर, अजय चौरे, डी.जे. परमार, एस.आर. भेलावे, वाय. बी. पटले, अशोक रावते, यशोधरा सोनवाने, बी.बी. ठाकरे, डी.एस. ढबाले, आर.जे. टेंभरे, के.आर. रहांगडाले, संजय जोगी, धनपाल पटले, ए.डी. पठाण, एम.आर. खेताडे, पी.बी. कमाने, ओमेश्वरी बिसेन, सूर्यकांता चव्हाण, आशा बागडकर व हजारो शिक्षकांचा समावेश होता.

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा