रेती तस्कारीवर आळा घालण्यासाठी टीसीएम लाईन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:27+5:302021-01-13T05:16:27+5:30
गोरेगाव : तालुक्यातील तिल्ली मोहगाव ते जांभळी रस्त्यावरील नाल्यातील रेती चोरीला आळा घालण्यासाठी वनविभागाने नवीन शक्कल लढविली आहे. ...

रेती तस्कारीवर आळा घालण्यासाठी टीसीएम लाईन ()
गोरेगाव : तालुक्यातील तिल्ली मोहगाव ते जांभळी रस्त्यावरील नाल्यातील रेती चोरीला आळा घालण्यासाठी वनविभागाने नवीन शक्कल लढविली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला टीसीएम लाईन खोदून एकप्रकारे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला आहे. वन विभागाचा हा प्रयोग कितपत यशस्वी होतो याकडे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरु आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. काही रेती घाट हे वन विभागाच्या हद्दीत येतात. रेतीची तस्करी करणारे रात्री बेरात्री रेतीची वाहतूक करीत असल्याने वन्यप्राण्यांनासुध्दा धाेका होत असून यामुळे शिकारीच्या घटनांमध्येसुध्दा वाढ झाली आहे. काही दिवसापूर्वीच या परिसरात दोन बिबट आणि एका नीलगायीची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी आणि रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाने टीसीएम लाईन खोदून आवर घालण्याचा प्रयत्न केला आहे.
तिल्ली मोहगाव परिसरात रेती चोरीचा प्रकार सर्रासपणे सुरू असताना त्याला लगाम लावण्यासाठी टीसीएम लाईन वरदान ठरत आहे. वनविभागाच्यावतीने जंगल परिसरात गस्त देण्यात येते. आता टीसीएम लाईन खोदल्याने अवैध रेती वाहतुकीला काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे चित्र आहे.