शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांत १.२७ कोटींचा कर वसुली

By admin | Updated: November 10, 2014 22:45 IST

मध्यमवर्गीय कुटुंब नगर परिषदेचे कर नियमित भरतो. मात्र राजकीय पुढारी व व्यापारी वर्गाकडून कर भरण्यात अनियमिता दिसून येते. ही नित्याचीच बाब आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी

देवानंद शहारे - गोंदियामध्यमवर्गीय कुटुंब नगर परिषदेचे कर नियमित भरतो. मात्र राजकीय पुढारी व व्यापारी वर्गाकडून कर भरण्यात अनियमिता दिसून येते. ही नित्याचीच बाब आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी गोंदिया नगर परिषदेला ११ कोटी १० लाख २ हजार ५१५ रूपयांचे टार्गेट दिले आहे. या चालू आर्थिक वर्षातील सात महिन्यांचा कालावधी लोटूनही नगर परिषदेकडे टार्गेचा पाव भागही कर जमा झालेला नाही. या सात महिन्यांत केवळ एक कोटी २७ लाख २६ हजार २६७ रूपये कर जमा झाला आहे. गोंदिया नगर परिषदेंतर्गत गोंदिया शहरात एकूण ३८ हजार घरे (कुटुंबे) आहेत. यापैकी काही कुटुंबीय नियमितपणे नगर परिषदेचे कर भरतात. यात मध्यमवर्गीयांचा अधिक समावेश आहे. मागील वर्षी सन २०१३-१४ मध्ये गोंदिया नगर परिषदेला १० कोटी ९५ लाख ५४ हजार ७८३ रूपये कर वसुलीचे टार्गेट होते. मात्र यापैकी केवळ एक तृतीयांश टक्केच म्हणजे तीन कोटी ८५ लाख ३१ हजार ९७७ रूपयेच कर वसुली झाली होती. तर यंदाही हीच अवस्था राहणार काय? असा प्रश्न साहजिकच निर्माण होत आहे. यंदा आर्थिक वर्षाचा अर्ध्यापेक्षा अधिक कालावधी लोटून गेला. वर्षभरासाठी ११ कोटी १० लाख दोन हजार ५१८ रूपयांच्या उद्दिष्टापैकी या सात महिन्यांत केवळ एक कोटी २७ लाख २६ हजार २६७ रूपयांची कर वसुली झाली आहे. तर चालू वर्षाच्या उर्वरित केवळ पाच महिन्यात उर्वरित नऊ कोटीपेक्षा अधिक रूपयांची कर वसुली होणार काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे.नगर परिषदेच्या या करामध्ये काही उपकरांचा समावेश आहे. यात मालमत्ता, शिक्षण, रोजगार हमी कर, वृक्ष कर, सफाई कर (स्वच्छता व आरोग्य), सेवा शुल्क, अग्निशमन व व्याज आदींचा समावेश असतो. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षास सुरूवात होते. एप्रिल ते जानेवारीपर्यंत १० महिन्यांच्या कालावधीत कमी प्रमाणात नगर परिषदेकडे कर जमे होते. तर त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने केवळ फेब्रुवारी व मार्च या दोनच महिन्यांत नागरिकांकडून कर भरले जाते, असे कर विभागाकडून सांगण्यात आले आहे. नगर परिषदेच्या मालमत्ता कर विभागातील कर्मचारी-अधिकारी कर वसुलीच्या टार्गेटपूर्तीसाठी खूप परिश्रम घेतात. याशिवाय नगर परिषदेने कर वसुलीसाठी जप्तीची प्रक्रियासुद्धा राबविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अचानक आलेल्या राजकीय दबावामुळे जप्तीची प्रक्रियाच न.प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बंद करावी लागल्याचे संबंधितांनी सांगितले. याशिवाय व्यापारी वर्ग नेहमीच वेळेवर कर भरण्यास कुचराई करतात. पाच हजार रूपयांचे कर वर्षाच्या शेवटी भरले तर त्यापूर्वी त्याच रूपयांचा उपयोग करून आठ हजार रूपये बनविण्याकडे त्यांचा कल असतो. यामुळेच नियमित कर न भरता आर्थिक वर्षाच्या शेवटी कर भरणे व्यापारी वर्ग पसंत करतो. यामुळेच उद्दिष्टपूर्ती न होता लोकांवरच कर बाकी राहतो. कर वसुलीसाठी जाणाऱ्या न.प. च्या कर्मचाऱ्यांना तुम्ही वारंवार का येता? अशा शब्दातही लोकांकडून अपमानास्पद बोलले जाते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचे खच्चीकरणच होत असल्याचे प्रकार गोंदिया शहरात सुरू आहेत. याशिवाय टॅक्सचे दर वेगवेगळ्या काळात ठराविक जागेच्या क्षेत्रफळानुसार कमी-अधिक होतात. एवढ्याच जागेचा आम्हाला जास्त कर तर दुसऱ्याला कमी का? असा सवालही नागरिक उपस्थित करतात. मात्र त्यांना कराबाबतच्या नवीन दराविषयी माहिती नसल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.