५.६४ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य
By Admin | Updated: June 22, 2014 00:02 IST2014-06-22T00:02:22+5:302014-06-22T00:02:22+5:30
पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशातून राज्य शासनाने सन २०१२-१३ पासून वृक्षारोपणाला प्रोत्साहीत करणा्री शतकोटी वृक्षारोपण योजना सुरू केली आहे. यंदा या योजनेंतर्गत जिल्ह्यात ५.६४ लाख वृक्षारोपणाचे

५.६४ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य
गोंदिया : पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशातून राज्य शासनाने सन २०१२-१३ पासून वृक्षारोपणाला प्रोत्साहीत करणा्री शतकोटी वृक्षारोपण योजना सुरू केली आहे. यंदा या योजनेंतर्गत जिल्ह्यात ५.६४ लाख वृक्षारोपणाचे उद्दीष्ट आहे. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करावयाचे आहे.
वाढत्या प्रदूषणाचे विविध अपाय आज सर्वांनाच दिसून येत आहेत. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाच्या या गंभीर बाबीला घेऊन शासन गंभीर झाले आहे. यामुळेच शासनाकडून प्रदूषणाच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून विविध योजना सुद्धा राबविल्या जात आहेत. त्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेवर सध्या जास्त जोर दिला जात आहे. कारण, प्रदूषणावर तोडगा म्हणजे वृक्ष हेच असून वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे झाले आहे. यामुळेच वाढत्या प्रदूषणाला लक्षात घेत सन २०१४-१५ करिता शासनाकडून देण्यात आलेल्या उद्दीष्टाच्या पूर्तीसाठी कृषी विभागाने हिवरा येथील नर्सरीत शतकोटी वृक्षारोपण योजनेंतर्गत विविध प्रजातींच्या रोपट्यांची रोपवाटिका तयार केली आहे. यामध्ये सीताफळाचे ४० हजार, लिंबाचे १० हजार, पेरूचे १० हजार, आवळ््याचे २० हजार, चिंचेचे १० हजार, गिरिपुष्पाचे ५० हजार, कडू लिंबाचे ५० हजार व बोराचे १० हजार रोपट्यांचा समावेश आहे.
याशिवाय तालुक्यातील विविध खासगी नर्सरींतही रोपवाटीका तयार केल्या गेल्या आहेत. शासन नियमानुसार जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय, सामाजीक संस्खा, शाळा, महाविद्यालय व साखर कारखान्यांच्या परिसरात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.
यासाठी हिवरा येथील शासकीय नर्सरीतून कृषी विभागाच्या माध्यमातून रोपट्यांचे नि:शुल्क वितरण केले जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेतात लावण्यासाठी रोपटे नि:शुल्क दिले जातील. (शहर प्रतिनिधी)