घेतला कानाेसा, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब ? कळणार आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:00 IST2022-02-10T05:00:00+5:302022-02-10T05:00:08+5:30

देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने, या ठिकाणी नगराध्यक्ष हा भाजपच होणार हे निश्चित आहे, पण येथे नगराध्यक्षपदासाठी संजू उईके, कौसल्या कुंभरे आणि नूतन कोवे हे इच्छुक असल्याने येथे तेढ वाढला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, यावर पुढील भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे यावरून भाजपमध्ये अस्वस्थता कायम आहे. 

Taken Kanesa, sealed in whose name? Will know today | घेतला कानाेसा, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब ? कळणार आज

घेतला कानाेसा, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब ? कळणार आज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरी नगरपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. आता नगराध्यक्षाची निवड करण्यासाठी १६ फेब्रुवारी निवडणूक होत आहे. यासाठी गुरुवारी (दि.१०) नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तीन नगरपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांची बैठक घेऊन नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावे जाणून घेतली. मात्र, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले हे गुरुवारीच कळणार आहे. 
देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने, या ठिकाणी नगराध्यक्ष हा भाजपच होणार हे निश्चित आहे, पण येथे नगराध्यक्षपदासाठी संजू उईके, कौसल्या कुंभरे आणि नूतन कोवे हे इच्छुक असल्याने येथे तेढ वाढला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, यावर पुढील भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे यावरून भाजपमध्ये अस्वस्थता कायम आहे. 
गुरुवारी या संदर्भात भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी बैठक घेतल्याची माहिती आहे, तर सडक अर्जुनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे. 
एकूण १७ सदस्य संख्या असलेल्या या नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ सदस्य असून, काँग्रेसचे २ आणि एका अपक्ष सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. येथे नगराध्यक्षपदासाठी तेजराम मडावी, कामिनी कोवे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नगराध्यक्षपदाला घेऊन नावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कुणाच्या नावावर शिक्कामाेर्तब करतात, हे गुरुवारी कळेल, तर अर्जुनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, काँग्रेसचे ४ शिवसेना १ आणि अपक्ष १ आणि भाजपचे ७ सदस्य निवडून आले. 
त्यामुळे येथे खिचडी स्थिती असून, कुणाची सत्ता बनेल, हे अद्यापही निश्चित झाले नाही. मात्र, याला घेऊन बुधवारी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठकी झाल्याची माहिती आहे. 
नेत्यांनी नगराध्यक्षपदावर कुणाची वर्णी लावायची, या विषयावर कानोसा घेतला. मात्र, कुणाच्या नावावर शिक्कामाेर्तब होते हे गुरुवारीच कळेल. 

 असा निवडणूक कार्यक्रम
- १० फेब्रुवारी : अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणे.
- १० फेब्रुवारी : नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व उमेदवारांची प्रसिद्ध करणे.
- १४ फेब्रुवारी : अपिलावर सुनावणी, यादी प्रसिद्ध करणे.
- १५ फेब्रुवारी : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस.
- १६ फेब्रुवारी : उपाध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणे.
- १६ फेब्रुवारी : विशेष सभा घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड जाहीर करणे.

पद एक अन् इच्छुक अनेक 
- नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षात इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एका नावावर शिक्का मोर्तब करताना नेत्यांची सुद्धा तारांबळ उडत आहे. बुधवारी (दि.९) याच विषयाला घेऊन राजकीय बैठका सुरू होत्या. 
नगरसेवकात फूट पडण्याची शक्यता 
- पक्षाच्या तिकिटावर जरी नगरसेवक निवडून आले असले तरी पदाची लालसा सर्वांनाच आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाला घेऊन पक्षातच दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या विषयाला घेऊन सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची सावध भूमिका घेतली असून नगरसेवकांवर बारीक नजर ठेवली आहे.

 

Web Title: Taken Kanesa, sealed in whose name? Will know today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.