राठोड यांच्यावर कठोर कारवाई करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:33 IST2021-03-01T04:33:31+5:302021-03-01T04:33:31+5:30

सालेकसा : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आरोप असलेेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला ...

Take stern action against Rathore () | राठोड यांच्यावर कठोर कारवाई करा ()

राठोड यांच्यावर कठोर कारवाई करा ()

सालेकसा : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आरोप असलेेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सालेकसा तालुका भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली.

सालेकसा तालुका भाजप महिला मोर्चातर्फे रविवारी (दि.२८) मुख्य रस्त्यावर निर्दशने काढण्यात आली. टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात असून महिलांचा सन्मान राखण्यासाठी राज्य शासन गंभीर नसल्याचा आरोप केला. अशात संजय राठोड यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली. मोर्चाचे नेतृत्व माजी जि.प. महिला व बाल कल्याण सभापती सविता पुराम, जिल्हा महामंत्री प्रतिभा परिहार यांनी केले. यावेळी तालुका अध्यक्ष सुषमा भुजाडे, मधू अग्रवाल, वर्षा बिसेन, प्रमिला दसरिया, कल्याणी कटरे, टीना चुटे व महिला पदाधिकारी उपस्थित हाेत्या.

Web Title: Take stern action against Rathore ()