मुजोर रेतीमाफियांवर कठाेर कारवाई करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:42+5:302021-02-05T07:44:42+5:30
गोंदिया : यवतमाळ जिल्ह्यातील नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर रेतीमाफियांनी जीवघेणा हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या ...

मुजोर रेतीमाफियांवर कठाेर कारवाई करा ()
गोंदिया : यवतमाळ जिल्ह्यातील नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर रेतीमाफियांनी जीवघेणा हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेर्धात व दोषींना अटक करून त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नागपूर विभागातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार व संघटनेने उपजिल्हाधिकारी यांनी मंगळवारी (दि. २) एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन केले. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुजोर रेतीमाफियांवर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. निवेदनातून रेती माफियांवर कारवाई करणाऱ्या महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा घटनांना पूर्णपणे पायबंद लावण्यात यावा. मुजोर रेतीमाफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी. वैभव पवार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, विजय राऊत, विजय बोरुडे, प्रशांत घोरुडे, डी. एस. भोयर, धनंजय देशमुख, रामकृष्ण कुंभरे, अनिल खडतकर, लीना फलके, एस. एम. रहांगडाले, पी. एस. शिंदे, अरुण भुरे, सीमा पाटणे, एस. एम. नागपुरे, प्रवीण जमधाडे, ओंकार ठाकरे, बी. टी. यावलकर, जी. आर. नागपुरे, संजय धार्मिक, एन. एम. गावळ, एस. वाय. चांदेवार, एन. एम. वेदी, एस. एन. बारसागडे. आर. जे. वाकचौरे आदींचा समावेश होता.