विना शासकीय परवानगी बुद्ध विहार तोडणाऱ्यांवर कारवाई करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST2021-09-10T04:35:41+5:302021-09-10T04:35:41+5:30

गोंदिया : विना शासकीय परवानगी बुद्ध विहार तोडणाऱ्या व महापुरुषांची मूर्ती हटविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील ...

Take action against those who break Buddha Vihar without government permission () | विना शासकीय परवानगी बुद्ध विहार तोडणाऱ्यांवर कारवाई करा ()

विना शासकीय परवानगी बुद्ध विहार तोडणाऱ्यांवर कारवाई करा ()

गोंदिया : विना शासकीय परवानगी बुद्ध विहार तोडणाऱ्या व महापुरुषांची मूर्ती हटविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील नागरिकांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना मागणीचे निवेदन दिले आहे.

माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या विकास निधीतून तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बुद्ध विहारचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, गावातील काही लोकांनी शासकीय परवानगी नसतानाही विहारची तोडफोड करून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती हटविली. विहाराची इमारत तोडणारे ग्रामपंचायत सदस्य असल्याने ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेकडून कारवाई करण्यात आली नाही. अशात शासकीय इमारतीला विना परवानगी तोडणाऱ्यांविरुद्द नियमानुसार फौजदारी गुन्हा नोंद करून कठोर करण्याचे आदेश संबंधितांना द्या, अशी मागणी बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी गुंडे यांच्याकडे केली असून त्यांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना, सिद्धार्थ मेश्राम, आशिष वैद्य, राजकुमार मेश्राम, संजय मेश्राम, रजनीकांत वैद्य, काशीनाथ मेश्राम, मिलिंद मेश्राम, सुदेश मेश्राम, सागर मेश्राम, आशिष मेश्राम, दिलीप मेश्राम यांच्यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Take action against those who break Buddha Vihar without government permission ()