गोंदिया जिल्ह्यातील शिंपी संघटना पुढे सरसावली; मास्कचे मोफत वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 15:27 IST2020-03-29T15:27:14+5:302020-03-29T15:27:42+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील शिंपी संघटननेने पुढाकार घेत मोठ्या प्रमाणावर मास्क तयार केले आहेत. या मास्कचे रविवारी वितरण करण्याचा त्यांचा विचार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील शिंपी संघटना पुढे सरसावली; मास्कचे मोफत वितरण
ठळक मुद्देमहागाव येथे रविवारी वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील शिंपी संघटननेने पुढाकार घेत मोठ्या प्रमाणावर मास्क तयार केले आहेत. या मास्कचे रविवारी वितरण करण्याचा त्यांचा विचार आहे. कोरोनापासून रक्षण करण्यासाठी मास्क हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. गावखेड्यात असे मास्क उपलब्ध नसतात. त्यामुळे येथील शिंपी संघटनेने एकत्र येऊन मास्क बनवण्याचा निर्णय घेतला व तो पूर्ण केला. येथील जि.प. प्राथमिक शाळेत हे मास्क बनवण्याचे काम करण्यात आले. शिंपी संघटनेच्या या निर्णयाचे व कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.