लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देश व राज्यात हिंदू व मुस्लीम समुदायात वैराच्या बातम्या येतात. मात्र गोंदिया शहरात असले प्रकार कधीही घडत नाही. मुस्लीम समाजाची देशाच्या स्वातंत्र्यापासून आजच्या आधुनिक भारताचा पाया ठेवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यामुळेच आम्ही दिवाळी जेवढ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करतो. त्याच भावनेने ईदही साजरी करतो. यामुळेच, गोंदिया शहर एकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.शहरातील गोविंदपूर परिसरातील मस्जीद जवळ आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर शादिखाना बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सय्यद इकबालुद्दीन होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद बांधकाम समिती सभापती शकील मंसुरी, व कॉँग्रेसचे प्रदेश सचिव राजेश नंदागवळी उपस्थित होते. याप्रसंगी नंदागवळी यांनी, मुस्लीम समाजाने आमदार अग्रवाल यांच्याकडे जेव्हाही मागणी केली. तेव्हा आमदार अग्रवाल यांनी निराश केले नसल्याचे सांगीतले.सभापती मंसुरी यांनी, आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात विकास कामांना गती दिली जात असल्याचे सांगीतले. प्रास्तावीक साबीर पठाण यांनी मांडले. संचालन शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाला अशोक चौधरी, पृथ्वीपालसिंह गुलाटी, राकेश ठाकूर, सुनील तिवारी, भागवत मेश्राम, देवा रूसे, इत्तेफाक आलम, रियाज कच्छी, नफीस सद्दीकी, खलील पठाण, इकबाल पठाण, हाजी खुर्शीद अली, सुभाष थरड, यासीन शेख, शहजादा शेख, नजीर शेख, अनिस खान, आजम सिद्दीकी यांच्यासह मोठ्या संख्येत मुस्लीम समाजबांधव उपस्थित होते.
गोंदिया शहर एकतेचे प्रतीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:34 IST
देश व राज्यात हिंदू व मुस्लीम समुदायात वैराच्या बातम्या येतात. मात्र गोंदिया शहरात असले प्रकार कधीही घडत नाही. मुस्लीम समाजाची देशाच्या स्वातंत्र्यापासून आजच्या आधुनिक भारताचा पाया ठेवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यामुळेच आम्ही दिवाळी जेवढ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करतो.
गोंदिया शहर एकतेचे प्रतीक
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : गोंिवंदपूर येथील शादिखाना बांधकामाचे भूमिपूजन