शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

२८ हजार क्विंटल लाकडे होळीत स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 5:00 AM

गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर दुसरीकडे जुन्या वृक्षांची कत्तल करून ते होळीत स्वाहा केले जात आहेत. यंदा होळीला जिल्ह्यात १३८७ सार्वजनिक व तर १४२१ ठिकाणी खासगी होळ्या जाळण्यात आल्या.यातील २८०७ होळींमध्ये २८ हजार ७० क्विंटल लाकडे जाळले गेली. या लाकडांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या जवळपास आहे.

ठळक मुद्देमौल्यवान वृक्षांची कत्तल : २८०८ ठिकाणी होळी दहन, पर्यावरणाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर दुसरीकडे जुन्या वृक्षांची कत्तल करून ते होळीत स्वाहा केले जात आहेत. यंदा होळीला जिल्ह्यात १३८७ सार्वजनिक व तर १४२१ ठिकाणी खासगी होळ्या जाळण्यात आल्या.यातील २८०७ होळींमध्ये २८ हजार ७० क्विंटल लाकडे जाळले गेली. या लाकडांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या जवळपास आहे.जिल्ह्यात सोमवार (दि.९) होलीका दहन तर मंगळवारी (दि.१०) धुळवड साजरी होत आहे. होळीचा सण उत्साहात व शांततेत पार पडावा यासाठी सोमवार व मंगळवारी (दि.१०) पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. यंदा शहर पोलीस ठाण्यांतर्गत शहर हद्दीत १३० सार्वजनिक व २४० खाजगी होळी, रामनगर पोलीस ठाणे हद्दीत ५५ सार्वजनिक होळी, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ५० सार्वजनिक होळी व १६० खाजगी होळी, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ७२ सार्वजनिक व १०८ खाजगी होळी, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत १० सार्वजनिक व ७० खाजगी होळी, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत ४८ सार्वजनिक व ६० खाजगी होळी, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ३५ सार्वजनिक होळी व २५ खाजगी होळी, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत ७२ सार्वजनिक होळी व ८८ खाजगी होळी, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १७० सार्वजनिक व ७० खाजगी होळींचे दहन करण्यात आले.सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत १९० सार्वजनिक व ३० खाजगी होळी, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत २३५ सार्वजनिक व २७ खाजगी होळी, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत ५० सार्वजनिक व २० खाजगी होळी, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत ३० सार्वजनिक व ३२५ खाजगी होळी,अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ९० सार्वजनिक व ५२ खाजगी होळी, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत ४५ सार्वजनिक व १० खाजगी होळी, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत २५ सार्वजनिक व ५० खाजगी होळी अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण १३८७ सार्वजनिक तर १४२१ खाजगी होलीका दहन करण्यात आले.होळीचा सण शांततेत आणि निर्भय व मोकळ्या वातावरणात पार पाडण्याकरिता पोलीस दलातर्फे सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.अवैध दारु व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन करण्यात आले आहेत. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. मात्र त्याच गावातील नागरिक जंगलातील, शेतातील लाकडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आज घडीला एक क्विंटल लाकडाची किमत ८०० रुपये सांगितली जाते. या २८ हजार क्विंटल लाकडांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे नागरिक जंगलातील लाकडे कापून होळीत जाळून आनंदोत्सव करतात.यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होतो.‘‘सण आनंदात साजरा करण्यासाठी ‘इको फ्रेन्डली होळी’ असा उपक्रम प्रत्येक गावात राबविला जाणे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. होळीचा सण स्नेह वाढविण्यासाठी आहे. शांततेत लोकांनी होळी साजरी करावी. रंगाचा वापर करू नये, वाद घालू नये.- मंगेश शिंदे,पोलीस अधीक्षक गोंदिया.तंटामुक्त समित्या लक्ष ठेवणारहोळीला धार्मिक भावना दुखावल्या जातील असे पोस्टर्स, देखावे, चित्र, नाटके किंवा प्रक्षोभक घोषणा देणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना देखील करण्यात आले आहे. होळीचा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी मोहल्ला कमिटी, ग्राम सुरक्षा दल व तंटामुक्त गाव समिती, पोलीस मित्र यांच्या बैठका घेतल्या आहेत.तंटामुक्त गाव समिती गावातील अवैध दारू बरोबर वाद घडवू नये यासाठी प्रयत्न केले जातील.

ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त करणारहोळीच्या सणाला समाज कंटक,समाज विघातक, मुलतत्ववादी व गुंड प्रवृत्तीचे इसम मद्यप्राशन करून अश्लिल वक्तव्य करणाºयांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त लावला आहे. धार्मिक स्थळावर गुलाल उधळणे, मुलींची छेडखानी करणे, होळी प्रथम कुणी पेटवावीे,एकमेकांच्या अंगावर गुलाल रंग, फुग्यांमध्ये पाणी भरुन मारणे, चिखल अंगावर टाकणे,ढोल-ताशे वाजवून नाचत गाजत फगवा काढणे,जुन्या वैनमस्यातून वाद निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणाºयावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.यासाठी तंटामुक्त समितीची मदत घेणार आहेत.

टॅग्स :Holiहोळी