‘शिवशाही’त वरिष्ठांना मिळणार सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:25 IST2018-06-02T21:25:16+5:302018-06-02T21:25:16+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सर्व प्रथम एसटी १ जून १९४८ ला अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावली होती. त्याच्या सन्मानार्थ एसटी महामंडळ दरवर्षी १ ज़ून हा दिवस एसटीचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करीत असतो. त्यानुसार येथील बसस्थानकात ७० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

‘शिवशाही’त वरिष्ठांना मिळणार सूट
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून येथील बसस्थानकात शुक्रवारी (दि.१) ७० वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला राप भंडाराचे पालक अधिकारी बी.पा.नंदनवार, आगार व्यवस्थापक पंकज दि. दांडगे राप तिरोडाचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक किरण चोपकर, रमाकांत खोब्रागडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर.गिरीपुंजे, कमल कापसे, रा.प.तिरोडाचे रा.प्र. ढोमणे, एम.पी.लोंदासे, अ.पा.उरकुडे, सातके, अ.पा.बडोले, म.ता.आगाशे व इतर अनेक कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सर्व प्रथम एसटी १ जून १९४८ ला अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावली होती. त्याच्या सन्मानार्थ एसटी महामंडळ दरवर्षी १ ज़ून हा दिवस एसटीचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करीत असतो. त्यानुसार येथील बसस्थानकात ७० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने अनेक प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी आगार व्यवस्थापक दांडगे यांनी, जेष्ठ नागरिकांना शिवशाही बसेस मध्ये ज्या वातानुकूलीत असतात त्यात बसून प्रवाशासाठी ४५ टक्के व झोपून प्रवासासाठी ३० टक्के सुट लागू करण्यात आल्याची माहिती देवून ही जणू काही जेष्ठ नागरिकांसाठी पर्वणीच असल्याचे सांगीतले. तसेच जेष्ठ नागरीकच आमचा खास ग्राहक आहे, तो तासभर सुद्धा बसची वाट बघत असून दुसरा पर्याय राहूनही त्या साधनांनी प्रवास करीत नसल्याचे सांगीतले.