न.प.च्या पोटनिवडणूक कार्यक्रमाला स्थगनादेश

By Admin | Updated: May 23, 2014 23:56 IST2014-05-23T23:56:54+5:302014-05-23T23:56:54+5:30

नगर परिषदेच्या प्रभाग-३, ४ व ८ मधील पुढील काळात होणार्‍या पोटनिवडणूक कार्यक्रमावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगनादेश दिला आहे. या स्थगन आदेशानंतर होणारा

Suspension of the by-election by the NP | न.प.च्या पोटनिवडणूक कार्यक्रमाला स्थगनादेश

न.प.च्या पोटनिवडणूक कार्यक्रमाला स्थगनादेश

गोंदिया : नगर परिषदेच्या प्रभाग-३, ४ व ८ मधील पुढील काळात होणार्‍या पोटनिवडणूक कार्यक्रमावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगनादेश दिला आहे. या स्थगन आदेशानंतर होणारा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करावा लागणार आहे. उल्लेखनिय म्हणजे दलबदल कायद्यांतर्गत प्रभाग-३, प्रभाग-४ व प्रभाग-८ चे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक भगत ठकरानी, ममता बन्सोड व निर्मला मिश्रा यांच्याविरूद्ध निर्णय देण्यात आले होते व त्यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. सदर ठिकाणी उपनिवडणूक करण्याचे निर्देश महाराष्टÑ निवडणूक आयोगाने दिले व शासनाच्या वतीने उपनिवडणूक घेण्यासाठी एक निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. हा कार्यक्रमही सुरू झाला होता. त्याअंतर्गत गोंदिया नगर परिषदेत मतदारांचे आक्षेप आमंत्रित करण्यात येत होते. या निर्णयाच्या विरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयात २० मे रोजी पारित आदेशात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली. न्यायालयाने संबंधिताना याची सूचना देवून पुढील सुनावणीसाठी जबाब मागितले आहे. सदर याचिकेची बाजू नागपूरचे अ‍ॅड. अमित माळीवाला यांनी वरिष्ठ अ‍ॅड. पेंढारकर यांच्या मार्गदर्शनात मांडली. शासनाकडून एजीपी राणे, भाजपाचे नगरसेवक अनिल पांडे यांच्या वतीने अ‍ॅड. मून यांनी काम सांभाळले. (प्रतिनिधी)

Web Title: Suspension of the by-election by the NP