विद्युत अभियंत्याचे आंदोलन स्थगित

By Admin | Updated: September 16, 2014 23:50 IST2014-09-16T23:50:50+5:302014-09-16T23:50:50+5:30

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील अभियंत्याची संघटना सबआॅर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन गोंदिया विभागाकडून १७ सप्टेंबर पासून साखळी उपोषण आंदोलनाची नोटीस देण्यात आली होती.

Suspended the movement of electrical engineer | विद्युत अभियंत्याचे आंदोलन स्थगित

विद्युत अभियंत्याचे आंदोलन स्थगित

गोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील अभियंत्याची संघटना सबआॅर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन गोंदिया विभागाकडून १७ सप्टेंबर पासून साखळी उपोषण आंदोलनाची नोटीस देण्यात आली होती. त्याअनुषंगाने कार्यकारी अभियंता बी.जी. भवरे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी १५ सप्टेंंबर रोजी चर्चा केली व अभियंत्यांच्या पगारातुन कपात केलेली रक्कम १९ सप्टेंंबर पर्यंत परत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे विद्युत अभियंत्यांचे साखळी उपोषण आंदोलन तुर्त स्थगित करण्यात येत असल्याची माहिती विभागीय सचिव सुनिल रेवतकर यांनी दिली.
गोंदिया शहर उपविभागातील संघटनेचे सभासद सहायक अभियंता रेवतकर, सुनिल मोहुर्ले, सुमित सु. पांडे यांच्या वेतनातुन तात्पुरता विज पुरवठाची थकबाकी माहे जुलै २०१४ मधून कपात करण्यात आली आहे. सदर कारवाई करताना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना संबंधितांना देण्यात आलेली नाही.
कार्यकारी अभियंता यांनी बोलाविलेल्या चर्चेला प्रशासनाकडून उपव्यवस्थापक प्रदिप गडपल्लीवार, कैलाश सुखदेवे तसेच संघटनेकडून पदाधिकारी मिथीन मुस्कुटे, सुनिर्ले, रेवतकर, ज्ञानेश शेंडे, हरीश डायरे उपस्थित होते. पश्चात सायंकाळी गोंदिया विभागीय कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन चुकीच्या पद्धतीने संघटनेच्या सभासदांच्या पगारातून रक्कम कपात करणे याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून द्वारसभा घेण्यात आली. या द्वारसभेला सुमित पांडे, विनय नेवारे, राजेश येळे, अनंत कार, प्रशांत वडसकर, राजीव घिके, महेश जयस्वाल, पडसकर, आशीय राय, अभिजीत भादककर, नावेद शेख, स्मिता वाडेकर, स्वाती चव्हाण, आनंद जैन, चंद्रशेखर जैनख, द्वारव्हेकर, प्रदीप मोहितकर, व्ही.पी. पशीने, डी.एस. कुथे बहुसंख्येने गोंदिया विभागातील अभियंते उभे होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Suspended the movement of electrical engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.