शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

मटण पार्टी करणारे चार कर्मचारी निलंबित

By admin | Updated: January 28, 2015 23:34 IST

नगर परिषदेद्वारा संचालित शहरातील माताटोली हायस्कूलमध्ये मटण पार्टी करणाऱ्या चौघांवर अखेर पालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. सोमवारी तसे आदेश

न.प. शाळेतील प्रकरण : वरिष्ठांनी तडकाफडकी दिले आदेश गोंदिया : नगर परिषदेद्वारा संचालित शहरातील माताटोली हायस्कूलमध्ये मटण पार्टी करणाऱ्या चौघांवर अखेर पालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. सोमवारी तसे आदेश चौघांनाही पाठविण्यात आले आहेत. विद्येच्या मंदिरात, त्यातही गणराज्य दिनी शाळेतील कर्मचाऱ्यांकडूनच असे कृत्य करण्यात आल्याने शहरवासीयांत या प्रकाराबद्दल चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे. एकीकडे गणराज्य दिन सर्वत्र जल्लोष व उत्साहात साजरा केला जात असताना माताटोली न.प. शाळेतील काही कर्मचारी मात्र तेवढ्याच उत्साहात शाळेतील भांडारकक्षात मटन पार्टी साजरी करीत होते. शाळेतील एका व्यक्तीच्या जन्मदिनाचा ‘एंजॉयमेंट’ सुरू असल्याची कुणकुण लागताच काही लोक तिथे पोहोचले आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडले. यादरम्यान तिथे उपस्थित काही शिक्षक पसार झाले तर शाळेचे परिचर मोहम्मद इरशाद शेख, रविकांत शर्मा, विनोद टेंभूर्णे व अनिल तिडके हे चौघे रंगेहात मिळून आले होते. घडलेल्या प्रकाराबाबत नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी व नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना माहिती देण्यात आली होती. यावर मुख्याधिकारी मोरे यांनी प्रशासकीय अधिकारी राणे यांना घटनास्थळी पाठविले होते. राणे यांनी शाळेत जाऊन पार्टी करण्यात आलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. तर नगराध्यक्ष जायस्वाल यांनी या चौघांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. (शहर प्रतिनिधी)इतरांवरही होणार का कारवाई? शाळेत मटण पार्टी करताना रंगेहात मिळून आलेल्या इरशाद शेख, रविकांत शर्मा, विनोद टेंभुर्णे व अनिल तिडके या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२७) सायंकाळी चौघांच्या निलंबन आदेशावर मुख्याधिकारी मोरे यांनी सायंकाळी स्वाक्षरी केली. बुधवारी (दि.२८) सकाळी या चौघांच्या निलंबनाचे आदेश शाळेत पाठविण्यात आले. मात्र इतर सहभागी शिक्षकांवर कारवाई होणार का? अशी चर्चा आहे.कोणाच्या जन्मदिवसाची पार्टी?मटण पार्टी करताना चौघे मिळून आले हे जरी खरे असले तरी या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. त्याचे कारण असे की, एका व्यक्तीच्या जन्मदिनाची पार्टी साजरी करण्यासाठी या चौघांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार ते चौघे शाळेत अन्य पाहुण्यांच्या खातरदारीसाठी तत्पर होते, अशी माहिती आहे. यातील अन्य पाहुणे निसटून गेले व हाती आलेले हे चौघे मात्र अडकले.