खासगी रुग्णालयांनाही रेमडेसिवीरचा पुरवठा करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST2021-04-10T04:28:41+5:302021-04-10T04:28:41+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येसोबतच आता मृतांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिक धास्तावलेले असून रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी ...

खासगी रुग्णालयांनाही रेमडेसिवीरचा पुरवठा करा ()
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येसोबतच आता मृतांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिक धास्तावलेले असून रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही रेमडेसिवीर लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे. तसेच यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यात आता बाधितांची संख्या दररोज ६०० वर येत असून सोबतच ५-६ रुग्णांचा जीव जात आहे. अशात रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर लसीचा वापर केला असून खासगी रुग्णालयात ते नसल्याने उपचारात अडचण येत आहे. अशात खासगी रुग्णालयांनाही त्याचा पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय, बाधितांची वाढती आकडेवारी बघता प्रभागनिहाय आरटी-पीसीआर चाचणी केंद्र तयार करावे. तसेच शासकीय रुग्णालयांत खाटांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे. यासाठी युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना युवा मोर्चा शहर अध्यक्ष पलाश लालवानी, प्रतीक तिवारी, ऋतुराज मिश्रा, विन्नी गुलाटी, पुरू ठाकरे, निखिल मुरकुटे, अर्पित पांडे व अन्य उपस्थित होते.