कोरोनाच्या लढ्यासाठी औषध, इंजेक्शन, व्हेंटिलेटरचा पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST2021-04-10T04:28:12+5:302021-04-10T04:28:12+5:30

गोंदिया : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना संसर्गाशी लढा देत असताना उपचारात्मक ...

Supply medicine, injections, ventilators to fight corona | कोरोनाच्या लढ्यासाठी औषध, इंजेक्शन, व्हेंटिलेटरचा पुरवठा करा

कोरोनाच्या लढ्यासाठी औषध, इंजेक्शन, व्हेंटिलेटरचा पुरवठा करा

गोंदिया : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना संसर्गाशी लढा देत असताना उपचारात्मक उपाययोजना कमी पडत आहेत. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात औषध, रेमडेसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर आदींचा तुटवडा भासत असल्याने रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांची तारांबळ उडत आहे. यामुळे राज्य शासनाने पर्याप्त प्रमाणात उपाययोजनात्मक औषध व साहित्यांचा पुरवठा करण्याची मागणी खा.प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

गोंदिया व भंडारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख झपाट्याने वाढत चालला आहे. वाढत्या रुग्णांमुळे शासकीय व खासगी रुग्णालयावरील ताण वाढत चालला आहे. कोरोना संसर्गाला प्रतिबंध लावण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे व आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे. गोंदिया जिल्ह्यातील रुग्णालयात व तालुक्यातील रुग्णालयात औषध, ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणेसह रुग्णांची तारांबळ उडत आहे. यासाठी राज्य शासनाकडून त्वरित उपाययोजना करून औषध व इतर साहित्याचा पुरवठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात यावे, या मागणीचे निवेदन खा.प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले आहे.

Web Title: Supply medicine, injections, ventilators to fight corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.