नगर पंचायत अध्यक्षपदी सुमन बिसेन विराजमान

By Admin | Updated: December 3, 2015 02:07 IST2015-12-03T02:07:20+5:302015-12-03T02:07:20+5:30

नगर पंचायतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन बिसेन आणि उपाध्यक्ष काँग्रेसचे ओमप्रकाश रामटेके यांनी आपला पदभार ..

Suman Bisen Vrajaman as the Chairman of Nagar Panchayat | नगर पंचायत अध्यक्षपदी सुमन बिसेन विराजमान

नगर पंचायत अध्यक्षपदी सुमन बिसेन विराजमान


देवरी : नगर पंचायतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन बिसेन आणि उपाध्यक्ष काँग्रेसचे ओमप्रकाश रामटेके यांनी आपला पदभार मंगळवारी नगर पंचायतीचे प्रशासक व तहसीलदार संजय नागतिळक यांच्याकडून स्वीकारला.
याप्रसंगी सर्वप्रथम प्रशासक संजय नाागतिळक यांनी नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला. तसेच नगर सेवक नेमीचंद आंबीलकर, रितेश अग्रवाल, प्रवीण दहिकर, कौशल्या कुंभरे, कांताबाई भेलावे, दविन्द्ररकौर भाटिया, अन्नुभाई शेख, कोकीला दखने, सीता रंगारी, यादवराव पंचमवार, संतोष तिवारी, हेमलता कुंभरे, अर्बन व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेश जैन, कृउबासचे सभापती रमेश ताराम, खरेदी-विक्री समितीचे सभापती पारबता चांदेवार, परमजितसिंग भाटीया, बंटी भाटीया, बिसेन यांनी पुष्पगुच्छांनी स्वागत केले.

Web Title: Suman Bisen Vrajaman as the Chairman of Nagar Panchayat