गोंदिया जिल्ह्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:38 IST2018-04-05T12:38:28+5:302018-04-05T12:38:37+5:30

येथील देवरी तालुक्यातील शिलापूर येथे स्नेहा नरेंद्र टेंभूरकर (२२) या नवविवाहितेचा मृतदेह गुरुवारी सकाळी गावाबाहेरील झाडावर आढळून आला.

Suicide by a newly married girl in Gondia district | गोंदिया जिल्ह्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

गोंदिया जिल्ह्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देझाडावर आढळला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: येथील देवरी तालुक्यातील शिलापूर येथे स्नेहा नरेंद्र टेंभूरकर (२२) या नवविवाहितेचा मृतदेह गुरुवारी सकाळी गावाबाहेरील झाडावर आढळून आला. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. देवरी-शिलापूरच्या नाल्यालगत असलेल्या एका झाडाला तिने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा गावकºयांमध्ये आहे. सहा महिन्यांपूर्वीच स्नेहाचा येथील एका युवकासोबत नोंदणी पद्धतीने विवाह झाला होता.
सर्व काही सुरळीत सुरू असताना तिने केलेल्या या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by a newly married girl in Gondia district

टॅग्स :Crimeगुन्हा