औषध विक्रेत्यांच्या बंद यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:47 IST2018-09-28T23:47:09+5:302018-09-28T23:47:40+5:30
अखिल भारतीय औषध संघटनेने आॅनलाईन औषध विक्र ी व ई-पोर्टलच्या विरोधात शुक्रवारी (दि.२८) देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. या बंदला गोंदिया जिल्हा औषधी विक्रेता संघाने पाठींबा दिला होता.

औषध विक्रेत्यांच्या बंद यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अखिल भारतीय औषध संघटनेने आॅनलाईन औषध विक्र ी व ई-पोर्टलच्या विरोधात शुक्रवारी (दि.२८) देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. या बंदला गोंदिया जिल्हा औषधी विक्रेता संघाने पाठींबा दिला होता. जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, सडक अर्जुनी यासर्वच तालुक्यातील औषध विक्रीची दुकाने दिवसभर बंद होती. जिल्ह्यात औषध विक्रेत्यांचा बंद शंभर टक्के यशस्वी झाला.
जिल्हा औषधी विक्रेता संघाने जमनालाल बजाज यांच्या प्रतिमेपासून मोर्चा काढून केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेध नोंदविला. मोर्चामध्ये उत्पल शर्मा, ललीत सोनछात्रा,रूपेश रहागंडाले, सुशील शर्मा, नत्थु शहा, पंकज अग्रवाल, राहुल गौतम यांच्यासह सर्वच औषध विक्रेते सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी १०० टक्के दुकाने बंद ठेवली होती. तसेच व्यापारात एफडीआयच्या सहभागाचा विरोधासाठी औषध विक्रेत्यांच्या बंदला गोंदिया शहरातील इतर व्यापारी संघटनांनीही पाठिंबा दिला होता. त्यामध्ये किराणा व्यापारी, कपडा व्यापारी, किरकोळ व्यापारी यांनी सुद्धा दुकाने बंद ठेवली आहेत. गोंदिया शहरात आज सकाळपासून औषध दुकानाप्रमाणे इतर दुकानेसुद्धा बंद होती.
तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.