विषय समिती सभापतींची निवडणूक १५ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:20+5:30
१६ फेब्रुवारी रोजी नगर परिषद सभापतींचा कार्यकाळ संपत आहे. एक वर्षाचा त्यांचा कार्यकाळ राहत असल्याने व १६ तारखेला रविवारी येत असल्याने १५ तारखेला सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. सध्या नगर परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे असून पाणी पुरवठा, शिक्षण, नियोजन, आरोग्य व महिला-बाल कल्याण समितीचे सभापतीही भाजपचेच आहेत.

विषय समिती सभापतींची निवडणूक १५ रोजी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेतील विषय समिती सभापतींचा कार्यकाळ येत्या १६ तारखेला संपत असल्याने १५ तारखेला सभापतींची निवडणूक घेतली जाणार आहे. सभापतीपद मिळावे यासाठी इच्छूकांकडून सेटींग तर लावली जातेच मात्र आता यंदा नवख्यांना संधी दिली जाते की जुने पुढे येतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१६ फेब्रुवारी रोजी नगर परिषद सभापतींचा कार्यकाळ संपत आहे. एक वर्षाचा त्यांचा कार्यकाळ राहत असल्याने व १६ तारखेला रविवारी येत असल्याने १५ तारखेला सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. सध्या नगर परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे असून पाणी पुरवठा, शिक्षण, नियोजन, आरोग्य व महिला-बाल कल्याण समितीचे सभापतीही भाजपचेच आहेत. सभापतिपदासाठी आतापर्यंत बघायचे झाल्यास सर्वांनाचा संधी दिली जात असल्याचे दिसून येत आहे. अशात यंदा मात्र काही जुन्या सदस्यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे यंदा नवख्यांना संधी देत जुन्यांनाही खुर्ची दिली जाते काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापती पदासाठी आतापासूनच इच्छूकांकडून इच्छा व्यक्त केली जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र पक्षाकडून ज्यांची नावे निश्चित केली जाणार त्यांच्याच गळ््यात सभापतीपदाची माळ पडणार हे सुद्धा तेवढेच खरे आहे. त्यामुळे आता १५ तारखेला सभापतीपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठ्या कलाटणीची शक्यता
नगर परिषदेत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मात्र राजकारणात कधी काय होणार हे सांगता येत नाही. कारण, नगर परिषदेतील संख्या बळ बघता भारतीय जनता पक्षाचे १८ सदस्य व नगराध्यक्ष असे १९ सदस्य होतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, नगर विकास आघाडीचे ८ व काँग्रेस पक्षाचे ९ सदस्य आहेत. अशात राष्ट्रवादी, आघाडी व काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी हात मिळवणी केल्यास त्यांचे २४ सदस्य होतात. मात्र यातील ३ सदस्य भाजपच्या विरोधात जाणार नसून ते भाजपसोबत राहत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे २१ तर तिघांच्या आघाडीचे २२ संख्याबळ होते. अर्थात, असे झाल्यास फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता टाळता येत नाही. असे झाल्यास भाजपसाठी येणारा काळ कठीण जाणार असे म्हणणे वावगे ठरणार नसून तशा चर्चाही रंगत आहेत.
खुर्चीसाठी सेटींग सुरू
नगर परिषदेत सभापती पदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त जोर बांधकाम समिती सभापतिपदासाठी लावला जातो. सध्या बांधकाम समिती सभापती धर्मेश अग्रवाल, नियोजन समिती सभापती सचिन शेंडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती वर्षा खरोले, शिक्षण समिती सभापती मौसमी सोनछात्रा व पाणी पुरवठा समिती सभापतीपदी नितू बिरीया आहेत. सर्वच भारतीय जनता पक्षाचे असून आतापर्यंत सभापतीपदासाठी सर्वांनाच संधी दिली जात असल्याचे दिसत आले आहे. त्यामुळे आता यंदाही उरलेल्या सदस्यांना संधी दिली जाईल असे वाटते.