न.प.शाळेच्या विद्यार्थ्यांची स्टंटबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:55 IST2019-01-31T21:54:54+5:302019-01-31T21:55:16+5:30
शहरात पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या नामाकिंत व शहरातील जुन्या असलेल्या मनोहर म्युनिसिपल शाळेचे विद्यार्थी दुपारच्या सुटीच्यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकाच्या डोळ्यादेखत छतावरील भिंतीवर चढून तसेच सळाखीवर चालण्याचा स्टंट करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी (दि.३०) शिवप्रतिष्ठानचे प्रमुख दुर्गेश रहागंडाले यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी शाळा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

न.प.शाळेच्या विद्यार्थ्यांची स्टंटबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरात पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या नामाकिंत व शहरातील जुन्या असलेल्या मनोहर म्युनिसिपल शाळेचे विद्यार्थी दुपारच्या सुटीच्यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकाच्या डोळ्यादेखत छतावरील भिंतीवर चढून तसेच सळाखीवर चालण्याचा स्टंट करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी (दि.३०) शिवप्रतिष्ठानचे प्रमुख दुर्गेश रहागंडाले यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी शाळा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
बुधवारी दुपारच्या सुमारास इंदिरा गांधी स्टेडीयम जवळील मनोहर म्युनिसिपल शाळेचे काही विद्यार्थी आपल्या जीवाशी खेळत ऊंच इमारतीच्या भिंतीवर स्टंट करीत असल्याचे आढळले.विद्याथ्यांचे स्टंट बघून कुठलीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दरम्यान हा प्रकार दिसताच दुर्गेश रहागंडाले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी याचे मोबाईलमध्ये चित्रण करुन जनतेत जागृतीच्या उद्देशाने सोशल मिडियावर अपलोड करीत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कहर उघडकीस आणला. नगर पालिकेच्या या शाळेच्या संबधितांनी यापुढे असे होणार नसल्याची ग्वाही दिली. मात्र रहांगडाले यांनी हा प्रकार उघडकीस आणला नसता तर मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे नगर परिषद प्रशासन यावर काय उपाय योजना करते याकडे लक्ष लागले आहे.