विद्यार्थी घेतात टॅबवर शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:17 PM2018-04-22T21:17:53+5:302018-04-22T21:17:53+5:30

नवनवीन तंत्रज्ञानाची दररोज भर पडत असून जीवनच काय शिक्षणही डिजीटल होत चालले आहे. यातूनच विद्यार्थीही आता फळ््यावरील शिक्षणासह टॅबवर शिक्षण घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, शहरात हे सुरू असताना जंगलात वसलेल्या नक्षलग्रस्त संवेदनशील येडमागोंदी गावातील शाळेतही हे चित्र बघावयास मिळत आहे.

Students take education on tabs | विद्यार्थी घेतात टॅबवर शिक्षण

विद्यार्थी घेतात टॅबवर शिक्षण

Next
ठळक मुद्देशिक्षकांना व्हावे लागले विद्यार्थी : येडमागोंदी शाळा ठरत आहे आदर्श

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवनवीन तंत्रज्ञानाची दररोज भर पडत असून जीवनच काय शिक्षणही डिजीटल होत चालले आहे. यातूनच विद्यार्थीही आता फळ््यावरील शिक्षणासह टॅबवर शिक्षण घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, शहरात हे सुरू असताना जंगलात वसलेल्या नक्षलग्रस्त संवेदनशील येडमागोंदी गावातील शाळेतही हे चित्र बघावयास मिळत आहे. येथील शाळेतील ३१ विद्यार्थी टॅबवर शिक्षण घेत आहेत.
महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून गडचिरोली जिल्ह्यापासून २ किमी अंतरावरील व गोंदियापासून १२० किमी अंतावरी डोंगराच्या कुशीत येडमागोंदी हे गाव वसलेले आहे. ४०० लोकसंख्या असलेले छोटेशे गाव गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात मिसपिरी केंद्रात आहे. हे संपूर्ण गाव आदिवासींचे आहे. डोंगरानी वेढलेले, घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त, गावात जायला पक्के रस्ते नाहीत. गावातील बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या गावातील शाळेला फुलविण्याचे काम रमेश बोरकर व सदाशिव पाटील या कर्तृत्ववान शिक्षकांनी केले.
कल्पनेला भरारीचे पंख देत त्यांनी विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्यासाठी तयार केले. यासाठी शिक्षकांना आधी विद्यार्थी व्हावी लागले. मूळात मराठी असलेल्या या शिक्षकांना आधी छत्तीसगडी भाषा शिकावी लागली व त्यांनी ती भाषा शिकून नंतर त्या विद्यार्थ्यांना मराठी शिकविली. ही सर्व किमया डाएटचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्या नेतृत्वात डॉ. किरण धांडे, सूचित्रा जाधव, संदीप सोमवंशी, दिलीप नवखरे, सुनील हरिणखेडे यांच्या मदतीने केली. या लोकांनी या शाळेचा अध्ययन स्तर वाढविण्यासाठी येडमागोंदी शाळेला अनेक भेटी दिल्यात.
दोन शिक्षक असलेल्या येडमागोंदी शाळेत ३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विविध उपक्रम घेऊन सदाशिव पाटील नावाच्या शिक्षकाने रमेश बोरकर यांच्या मदतीने येथील विद्यार्थ्यांना मराठी व गणित विषयात प्रगत केले. ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्ययन-अध्यापन केले जाते. विद्यार्थी स्वत: कविता व गोष्टी तयार करतात. या विद्यार्थ्यांची बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी असली तरी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांच्या प्रभावामुळे मराठी भाषा बोलतात.
परिणामी ही शाळा १०० टक्के प्रगत म्हणून नावारुपास आली.
‘जे राव न करे-ते गाव करे’ चा प्रत्यय येडमागोंदी या गावात आला. येथे पालक व शिक्षकांत उत्तम समन्वय आहे.
गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन शाळा डिजीटल व टॅबयुक्त करण्यासाठी आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा ७० हजार रुपयांची शाळेला मदत केली. गावकरी व शिक्षकांनी मिळून डिजीटल, टॅबयुक्त व गुणवत्ता पूर्ण शाळा तयार केली. या शाळेतील विद्यार्थी टॅबचा वापर करतात.

Web Title: Students take education on tabs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.