शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते चौथीतील विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक; पण पालक म्हणतात तूर्तास नकोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

अजून काही दिवस वाट पाहू. त्यानंतरच मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेऊ. मात्र, तूर्तास तरी यासाठी घाई नको, असा सूर पालकांमध्ये आहे, तर मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने पहिली ते चौथीचे सर्वच विद्यार्थी घरीच आहेर. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असला तरी मुले घरी राहून कंटाळली आहेत. त्यांच्यामध्ये चिडचिडपणा वाढत चालला आहे, तर कधी एकदाची शाळा सुरू होते आणि आपले आई-वडील आपल्याला शाळेत पाठवितात याची उत्सुकता मुलांमध्ये आहे.

ठळक मुद्देऑनलाइन अभ्यासाचा कंटाळा : मुलांमध्ये वाढली चिडचिड, पालकांचे सावध पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले आहेत. १५ जानेवारीपासून महाविद्यालयेसुद्धा सुरू होणार आहेत; पण पहिली ते चौथीसंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण आता शाळेत जावे, असे वाटत असले तरी त्यांच्या पालकांची मात्र अद्यापही यासाठी मानसिकता तयार झालेली नाही. अजून काही दिवस वाट पाहू. त्यानंतरच मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेऊ. मात्र, तूर्तास तरी यासाठी घाई नको, असा सूर पालकांमध्ये आहे, तर मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने पहिली ते चौथीचे सर्वच विद्यार्थी घरीच आहेर. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असला तरी मुले घरी राहून कंटाळली आहेत. त्यांच्यामध्ये चिडचिडपणा वाढत चालला आहे, तर कधी एकदाची शाळा सुरू होते आणि आपले आई-वडील आपल्याला शाळेत पाठवितात याची उत्सुकता मुलांमध्ये आहे. कोरोनाचा संसर्ग जरी पूर्णपणे कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर आली असली, तर पालकांना अजूनही आपल्या पाल्यांची काळजी वाटत असून, शाळांमध्ये पाठविल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेतली जाणार की नाही, अशी चिंतासुद्धा त्यांना वाटत आहे. त्यामुळेच ते तूर्तास तरी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.  

पालकांची चिंता कायम कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असला तरी पहिली ते चौथीत जाणारी मुले ही लहान असतात. त्यामुळे ती शाळेत गेल्यानंतर स्वत:ची काळजी घेणार की नाही, हे सांगता येत नाही. तूर्तास तरी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करू नयेत.-श्वेता मस्के, पालकशासन जरी पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा विचार करत असले तरी पालक तयार होणार नाहीत. अजून काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तूर्तास तरी मुलांना शाळेत पाठविण्याची घाई करणार नाही. -डॉली काकडे, पालकपहिली ते चौथीत शिकणारी मुले ही फार लहान असतात. त्यामुळे शाळेत गेल्यानंतर स्वत:ची तेवढी काळजी घेऊ शकणार नाहीत, तर पालकांनासुद्धा सतत काळजी लागून राहील. त्यामुळे तूर्तास तरी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करू नयेत. -प्रशांत मेश्राम, पालकपहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या तरी मी माझ्या पाल्यांना सध्या तरी शाळेत पाठविणार नाही. अजून काही दिवस वाट पाहणार, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावरच मुलांना शाळेत पाठविणार. शाळेत पाठविण्याची घाई नको.-प्रमोद पारखी, पालक  

मुलांना हवी शाळा; पण पालकांची ना घरी राहून मलासुद्धा आता कंटाळा आला आहे. कधी एकदाची शाळा सुरू होते आणि मी शाळेत जातो याची उत्सुकता लागली आहे; पण माझे ममी-पप्पा काळजीपोटी अजून काही दिवस शाळेत जाऊ नको म्हणतात. -राघिनी शेंडे, इयत्ता पहिली

शाळा बंद असली तरी आमचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे; पण जी मजा शाळेत गेल्यानंतर येते ती मजा या अभ्यासात येत नाही. शाळा सुरू झाली, तर मी नक्कीच शाळेत जाईन. -रोहित हिवारे, इयत्ता दुसरी

माझा मोठा भाऊ पण आता शाळेत जात आहे; पण आमची शाळा अजून सुरू झाली नाही. आमची शाळा सुरू झाल्यावर मीपण नियमित शाळेत जाईन. घरी राहून आता कंटाळाला आला आहे. -प्रत्यूष अग्निहोत्री, इयत्ता तिसरी

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी