विद्यार्थी, पालक आंदोलनाच्या पावित्र्यात
By Admin | Updated: August 9, 2014 23:47 IST2014-08-09T23:47:37+5:302014-08-09T23:47:37+5:30
दवनीवाडा जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान शाखेत अध्यापक व कनिष्ठ व्याख्यातांचा अनुशेष असल्याने विद्यार्थीनी व पालक शाळा समितीने आक्रमक

विद्यार्थी, पालक आंदोलनाच्या पावित्र्यात
परसवाडा : दवनीवाडा जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान शाखेत अध्यापक व कनिष्ठ व्याख्यातांचा अनुशेष असल्याने विद्यार्थीनी व पालक शाळा समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी विद्यार्थी, पालक, शाळा समिती व ग्राम पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा प्राप्त व्हावी यासाठी शासन स्तरावरून भरघोस प्रयत्न केले जातात. मात्र प्रशासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे या योजनेलाच तडे जात आहेत. यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना लोटला. दवनीवाडा जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या संख्येने ग्रामीण विद्यार्थीनी प्रवेश घेतला. शाळा समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्यांनी विद्यार्थीसाठी मोठे परिश्रम घेतले. मात्र येथील कला व विज्ञान शाखेत शिक्षक व्याख्यातांचा मोठा अनुशेष आहे.
दवनीवाडा येथील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ४७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्ग ८ ते १० विद्यार्थी संख्या १४५, वर्ग ५ ते ७ विद्यार्थी संख्या १७०, वर्ग ११ व १२ मध्ये १६० विद्यार्थी शिक्षक घेत आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेसाठी केवळ इंग्रजी, इतिहास या दोन विषयाचे व्याख्याते कार्यरत आहेत. येथे मराठी, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांसाठी व्याख्याते नाहीत. हायस्कूल विभागासाठी गणित शिक्षक नाही. विज्ञान शाखेचे शिक्षक नाही. मात्र विनाअनुदानित वर्ग आहे. विज्ञान विषयासाठी शाळा समिती ग्राम पंचायतीने आपल्या स्तरावरून शिक्षकांची शिकवणीसाठी पूर्तता करायला हवी होती. मात्र तशी व्यवस्था करण्यात आली नाही. जि.प. फक्त पारदर्शक अभियानाची वाच्यता करीत आहेत. ही बाब जि.प. शाळामध्ये नवीन नाही. मागील वर्षीसुध्दा या कनिष्ठ महाविद्यालयात अशीच स्थिती होती. हायस्कूल विभागाचे गणित शिक्षक सी.बी.नागदेवे हे सुट्टीचा अर्ज न देता सतत महिन्याकाठी गैरहजर आहेत. मागील वर्षीच्या सत्रात अभ्यासक्रम पूर्ण केले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. २२ जुलै रोजी पासून सुट्टीचा अर्ज नसताना सतत गैरहजर आहेत. या संदर्भात शिक्षणाधिकारी यांना तक्रार करण्यात आली. परंतु त्यांनी याची दखल घेतली नाही. तक्रारीला केराच्या टोपलीत टाकले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे शिक्षकांची प्राध्यापकांची मागणी करून संपूर्ण वर्ष व्याख्याताविना होते. मात्र या गंभीर विषयाकडे अधिकारी, पदाधिकारी, जि.प. सदस्य लक्ष देत नाही. जि.प.चे अधिकारी व पदाधिकारी केवळ कोरडी आश्वासने देतात. या शाळेत शिक्षक नसल्यामुळे त्यांची दयनिय अवस्था आहे.
दवनीवाडा येथे दोन खाजगी शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा कल खाजगी शाळेकडे आहे. शाळा समितीचे काही सदस्यांमुळे ही शाळा डबघाईस जात आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जात असून त्यांची खाजगी शाळेत लुबाडणूक होत आहे. या शाळेला सुगीचे दिवस आले. विद्यार्थी संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. येथे शिक्षक नाहीत. मात्र शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नसेल तर जिल्हा परिषद शाळात शिकविण्याचा अर्थ काय असा प्रश्न पालक विचारत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयात गणित शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता. नुकसान टाळण्याचे दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने शिक्षकाची नियुक्ती करावी व शिक्षक सी.बी.नागदेवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी उपसरपंच गुड्डु लिल्हारे, डामनिक लिल्हारे, शैलेश उईके, रोशन चौधरी, सफी शेख, भैयालाल सुर्यवंशी, प्रेमसिंह मंजुटे, शाळा अध्यक्ष भमेश्वर बागळे, पालक व विद्यार्थ्यांनी शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)